वीजबिल दुरुस्तीचा फायदा ४१ लाख शेतकऱ्यांना - डॉ. एन. डी. पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

कोल्हापूर - ‘राज्यातील सर्व ४१ लाख कृषिपंपधारक वीज ग्राहकांची बिले तपासून दुरुस्त केली जाणार आहेत. सहकारी पाणीपुरवठा संस्थांनी १ रुपये १६ पैसे प्रति युनिट दरानेच वीज बिले भरावीत. १५ ऑगस्ट २०१८ पर्यंत ही बिले तपासून दुरुस्त केली जातील,’ असे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी सांगितले.

विधानसभेवर शेतकऱ्यांनी एकजुटीने काढलेल्या मोर्चाचे हे यश असल्याचे प्रा. पाटील यांनी नमूद केले. 

प्रा. पाटील म्हणाले, ‘‘राज्यातील सर्व ४१ लाख शेतकऱ्यांच्या वीजपंपांची बिले दुरुस्त करून दिली जातील. त्याच बिलांच्या आधारे नवीन कृषी संजीवनी योजना राबविली जाणार आहे. राज्यातील सर्व सहकारी पाणीपुरवठा संस्थांची वीजबिले १ रुपये १५ पैसे प्रति युनिट या दराने भरून घेतली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.’’  

विद्युत नियामक आयोगाने तीन वेळा कृषिपंप दरात वाढ केली. शेतकरी वीजग्राहकांच्या दरात व थकबाकीत प्रचंड वाढ झाली. राज्यातील सर्व कृषिपंपधारक शेतकऱ्यांसाठी शासकीय सवलतीचे वीजदर नव्याने निर्धारित केले जाणार आहेत.

इरिगेशन फेडरेशनने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय मोर्चात राज्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांबरोबरच वैयक्तिक कृषिपंपधारक सहभागी होते. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्ष व संघटना सहभागी होत्या. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी भेटून पाठिंबा दिला. दुपारनंतर विधान भवनात दीड तास झालेल्या बैठकीनंतर सायंकाळी मोर्चाची सांगता झाली. त्यावेळी प्रताप होगाडे, बाबासो पाटील-भुयेकर, आर. जी. तांबे, विक्रांत पाटील किणीकर, अरुण लाड, जे. पी. लाड, चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Dr N D Patil comment