कोल्हापूरातील १९ ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘ड्रेसकोड’

नंदिनी नरेवाडी
रविवार, 24 जून 2018

कोल्हापूर - दहावी पास झाल्याने आवडेल ती नव्हे, तर महाविद्यालयाने ठरवलेल्या ड्रेसकोडमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींना यावे लागेल. यंदा गुलाबी, निळा, पिवळा अशा रंगसंगतीतील ‘ड्रेसकोड’ला महाविद्यालयांनी पसंती दिली आहे. शहरातील १८ ते १९ कनिष्ठ महाविद्यालयांत ड्रेसकोड सक्तीचा केला आहे. फॅशनेबल कपडे वापरणाऱ्यांना आवर घालून शिस्तीचे धडे देण्याचा महाविद्यालयांचा प्रयत्न आहे. 

शहरातील बहुतांशी सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांनी तर विवेकानंद महाविद्यालयाने यंदापासून वरिष्ठ महाविद्यालयाला ड्रेसकोड सक्तीचा केला आहे. त्यातही विद्यार्थिनींसाठी ड्रेस कोडचे काटेकोर पालन करण्याकडे महाविद्यालयांनी विशेष लक्ष दिले आहे.

महाविद्यालयात विविध ‘डे’ चे फॅड आले. हीच संधी साधून काही जण पळवाटा काढत ड्रेसकोडला फाटा देत फॅशनेबल कपड्यांना प्राधान्य देत कॅम्पसमध्ये ‘कॅटवॉक’ करतात. काही महाविद्यालयांतील प्राचार्यांनी मात्र आळा घालत ड्रेस कोडची सक्‍ती केली आहे.

विद्यार्थी फॅशनेबल कपड्यांवरून चेष्टेचा विषय होऊ नयेत त्यातून काही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून ड्रेसकोड ची खबरदारी घेतल्याचे महाविद्यालयातून सांगण्यात आले.

विशेष लक्ष विद्यार्थ्यीनींकडे 
फॅशन म्हणून विद्यार्थीनींकडून लक्ष विचलीत करणाऱ्या वेशभूषा केल्या जातात. यातून काही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी विद्यार्थीनींच्या पेहरावाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. महाविद्यालयात मुलींसाठी चुडीदार पद्धतीचा तर मुलांना शर्ट-पॅंट असा ड्रेस कोड आहे.

  • ‘विवेकानंद’मध्ये वरिष्ठ महाविद्यालयातही ड्रेसकोड
  • आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा अन्य ड्रेसची परवानगी
  • एकात्मता वाढीस लागावी यासाठी ड्रेसकोड
  • विविध शाखेचे विद्यार्थ्यांना शाखानिहाय गणवेश रंग 
  • व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्याना सक्‍तीचा
     
महाविद्यालयाची शिस्त, तसेच यंदापासून विद्यापीठाच्या खुल्या निवडणुका होणार असल्याने बाहेरच्या विद्यार्थ्याचे यात वर्चस्व राहू नये, विद्यार्थ्यांची ओळख पटावी, यासाठी ड्रेसकोड सक्‍तीचा केला आहे. 
-डॉ. एस. व्हाय. होनगेकर,
प्राचार्य विवेकानंद कॉलेज.

Web Title: Kolhapur News Dress code in Junior college