दुर्गेश लिंग्रस यांच्यासह पाच अटकेत, कोठडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

उंब्रज - कल्याण जनता सहकारी बॅंकेच्या कोल्हापूर येथील शाखाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक तसेच मारहाण व शिवीगाळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवसेनेचे कोल्हापूर शहरप्रमुख दुर्गेश उदयराव लिंग्रस (वय ४०, रा. राजारामपुरी, दुसरी गल्ली) यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली. या पाचही जणांना कराड येथील न्यायालयाने सोमवारी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बॅंक शाखाधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी लिंग्रस यांच्यासह पाच जणांविरोधात रविवारी (ता. २४) गुन्हा दाखल केला होता. रात्री उशिरा त्यांना ताब्यातही घेतले होते. या प्रकरणी आज संशयितांना अटक करून कऱ्हाड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

राजेंद्र आनंदराव मोहिते (वय ४५, सध्या रा. सातारा, मूळ रा. कोरिवळे, ता. कऱ्हाड) असे आत्महत्या केलेल्या शाखाधिकाऱ्यांचे नाव आहे. बॅंक महिला कर्मचारी दीपाली स्वरूप लगारे (३०), पती स्वरूप मोहन लगारे (३२), सासू राजश्री मोहन लगारे (६०), सासरा मोहन गुंडू लगारे (६४) अशी अटक केलेल्या अन्य संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी संदेश शिवाजी मोहिते (रा. कोरिवळे, ता. कऱ्हाड) यांनी फिर्याद दिली आहे. 

चिठ्ठी सापडली...
दरम्यान, आत्महत्येपूर्वी राजेंद्र मोहिते यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. शनिवारी (ता. २३) उंब्रजच्या हद्दीतील शुभम पेट्रोलपंपालगत रात्रीच्या सुमारास मोहिते यांचा मृतदेह आढळून आला होता. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र शिंदे तपास करीत आहेत.

Web Title: kolhapur news durgesh lingraj arrested