आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने लिहिले शाहू महाराजांवर पुस्तक

मोहन नेवडे
मंगळवार, 26 जून 2018

राधानगरी - देशातले पहिले मोठे धरण जिल्ह्यातील राधानगरीत आकारास आले. आपले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानचा खजिना रिकामा केला. मात्र, धरण उभारणाऱ्या या राजाची किती जणांना सखोल माहिती याचा विचार केला तर अनेक प्रश्‍न उभारतात; पण राधानगरी विद्यालयात आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या अवघ्या चौदा वर्षांच्या गायत्री सुरेश शिंदे हिने शाहू महाराजांवरील ‘माझा राजा शाहूराजा’ हे पुस्तक संपादित केले आहे. 

राधानगरीतील अनेक दुर्लक्षित घटना तिने गोळा करून या पुस्तकात मांडल्या आहेत. ती येथील पहिली बाललेखिका बनली आहे.

गायत्री ही वर्गात हुशार आहेच; शिवाय तिचे वक्‍तृत्वही चांगले आहे. येणाऱ्या शंकांचे शिक्षकांकडून वेळोवेळी निरसन करून घेत असते. तिसरीत असताना शाहू महाराजांच्या जीवनावर तिने पहिल्यांदा भाषण केले होते, त्यात तिचा नंबरही आला. बक्षीस म्हणून शाहू महाराजांचा तिला फोटो मिळाला होता. हाच फोटो तिला जीवनात स्फूर्ती देऊन गेला. त्या दिवसापासून तिला शाहू महाराजांच्या जीवनावरील पुस्तके वाचण्याचा छंद जडला. 
तिने अनेक पुस्तके वाचली. त्यानंतर शाहू महाराजांची कर्मभूमी असलेल्या राधानगरीतील ज्येष्ठ व्यक्तींकडून तिने महाराजांविषयीची माहिती जमविण्याची मोहीम सुरू केली.

यातून तिला राजांच्या जीवनावरील अलिखित माहिती मिळत गेली आणि या माहितीचा तिने संग्रह केला. पुस्तकातून मिळालेली माहिती, संग्रहित केलेले ज्ञान विखुरलेल्या स्वरूपात होते. ते तिने सुसंगत आणि आकर्षक स्वरूपात एकत्र आणून ते लोकांपर्यंत पोचविण्याचा मानस केला. तब्बल ६६ जीवनप्रसंग आणि तितक्‍याच छायाचित्रांचे सुंदर असे पुस्तक तयार झाले आहे.

या लेखनाचे श्रेय माझ्या वडिलांना देऊ इच्छिते. शाहू महाराजांवर लेखण करण्याबाबत त्यांनीच मला सुचविले. शाहू जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा होत आहे हे माझे भाग्य समजते.
- गायत्री शिंदे

Web Title: Kolhapur News Eight standard student write Book on Shahu Maharaj