वीज चोरीच्या आरोपातून आमदार हाळवणकर निर्दोष

वीज चोरीच्या आरोपातून आमदार हाळवणकर निर्दोष

इचलकरंजी - वीज चोरी व मीटर छेडछाड केल्याच्या आरोपातून आमदार सुरेश हाळवणकर यांची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याबाबत गेली दहा वर्षे आपल्या विरोधात करण्यात आलेल्या राजकीय षड्‌यंत्राची अखेर झाली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोरोची येथील यंत्रमाग कारखान्यातील विद्युत मीटरमध्ये फेरफार करुन वीज चोरी केल्याबाबत आमदार हाळवणकर यांचे बंधू महादेव हाळवणकर यांच्यावर महावितरण कंपनीने गुन्हा नोंद केला होता. याबाबत तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांनी विधान सभेत प्रश्‍न उपस्थीत केल्यानंतर आमदार हाळवणकर यांच्यावरही गुन्हा नोंद केला होता. त्यावर इचलकरंजीतील जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार हाळवणकर व त्यांचे बंधू महादेव हाळवणकर यांना तीन वर्षाची शिक्षा सुनावली होती. 

या शिक्षेच्या विरोधात आमदार हाळवणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यामध्ये न्यायाधिश मृदुला भाटकर यांनी शिक्षेला स्थगिती दिली होती. तसेच त्यांच्या दोषसिध्दीच्या निर्णयालाही स्थगिती दिली होती. तथापि, मिटरमध्ये फेरफार केल्याबाबतचा आरोप काढून टाकण्यासाठी आमदार हाळवणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com