हत्ती डिगस भागातच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

राधानगरी - दाजीपूर अभयारण्यात शिरलेल्या हत्ती डिगस परिसरातील जंगलात तळ ठोकला आहे. अनेक ग्रामस्थ व वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्याने दर्शन दिले असून त्याच्याकडून कसलाही उपद्रव झालेला नाही.

राधानगरी तलावाच्या डाव्या तीरावर सरकलेल्या या हत्तीच्या मागावर आजही वन विभागाचे कर्मचारी होते. त्यांनी कारिवडे, डिगस परिसरातील नुकसानीचा पंचनामा केल्यानंतर हत्तीचा शोध सुरू केला. काहींना त्याची पायसर आढळली, तर काहींना तो डिगस ते ठक्‍याचावाडा दरम्यानच्या जंगलात झोपलेला दिसून आला. दिवसभर येथेच तो रेंगाळत होता.

येथून उत्तरेकडे सरकल्यास तो तुळशी-धामणी परिसरात जाऊ शकतो. तिकडे गेल्यास मात्र त्याच्या परतीची शक्‍यता कमी आहे. 

Web Title: kolhapur news elephant