हत्ती - मुक्काम पोस्ट धावडी!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

बाजारभोगाव - मानवाड, पिसात्री परिसरातला हत्ती आता पेंडाखळे (शाहूवाडी) भागात पोहोचला आहे. जाता जाता त्याच्याकडून शेतीचे नुकसान ठरलेले आहे; पण माणसांना न बुजता न घाबरता त्याचा सुरू असलेला प्रवास लोकांत मात्र घबराट निर्माण करत आहे.

बाजारभोगाव - मानवाड, पिसात्री परिसरातला हत्ती आता पेंडाखळे (शाहूवाडी) भागात पोहोचला आहे. जाता जाता त्याच्याकडून शेतीचे नुकसान ठरलेले आहे; पण माणसांना न बुजता न घाबरता त्याचा सुरू असलेला प्रवास लोकांत मात्र घबराट निर्माण करत आहे. ज्यावेळी हत्तीचे या परिसरात आगमन झाले, त्यावेळी त्याचे दर्शन क्वचितच होत होते. आता मात्र हत्ती या परिसराला सरावलेला आहे. त्याच्यावर दहा पंधरा बॅटरीचे झोत टाकले, तरी हत्ती चाले अपनी चाल, असा त्याचा प्रवास सुरू आहे. 

सोमवारी पिसात्री परिसरात असलेला हत्ती काल रात्री खापणेवाडी, पिसात्री, कापलिंग डोंगर, पाटपन्हाळापैकी बांद्रेवाडी येथे पोहोचला. त्याचा वनविभागाने माग काढण्याचा प्रयत्न केला असता कपलिंग डोंगर परिसरात तो जात असलेल्या व परत फिरलेल्या खुणाही मिळून आल्या. त्यामुळे त्याचा वावर पेंडाखळे परिसरातच आहे. या निष्कर्षांपर्यंत वनखाते येऊन पोहोचले आहे. 

दरम्यान, या परिसरातला हा हत्ती गेल्या वर्षी आलेलाच हत्ती आहे का? याबद्दल थोडा संभ्रम होता. कारण त्याच्या पावलाचे ठसे, त्याचे सुळे यात फरक जाणवत होता; पण दहा-पंधरा दिवसांच्या निरीक्षणानंतर आता हा हत्ती गेल्यावर्षी येऊन गेलेलाच हत्ती असल्याचे वन खात्याचेही म्हणणे आहे.

हा हत्ती उग्र नाही. आतापर्यंत तरी तो कोठेही आक्रमक झालेला नाही. लोक त्याच्यावर बॅटरीचे झोत टाकतात. हुसकावण्यासाठी पाठलाग करतात. अर्थात असे प्रकार होत राहिल्यास हत्ती आक्रमक बनू शकतो. तो ताशी ४० किलोमीटर वेगाने पाठलाग करू शकतो. त्यामुळे लोकांनी हत्ती बिथरेल, असा कोणताही प्रकार करू नये. 
- प्रशांत तेंडुलकर,
रेंज फॉरेस्ट ऑफिसर

Web Title: Kolhapur News Elephant in Dhavadi

टॅग्स