आजरा तालुक्यात वेळवट्टी परिसरात हत्तींची दहशत 

रणजित कालेकर
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

आजरा - वेळवट्टी परिसरात हत्तीच्या कळपाची दहशत पसरली आहे. पाच हत्तींचा कळप या परिसरात वावरत आहे. प्रकाश शिंदे व सुधीर कुंभार यांनी हे हत्ती पाहिले असून कळपात तीन मोठे व दोन लहान पिल्ले आहेत. परिसरात हत्तीचा कळप आल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून पिक वाचवणे शेतकऱ्यांना कसरतीचे झाले आहे. 

मसोली व हाळोलीच्या जंगल परिसरातून हत्तीचा कळप वेळवट्टी परिसरात उतरला आहे. या जंगला लगत सुधीर कुंभार यांचे शेत आहे. हत्तीने नारळाची दोन झाडे मोडली आहेत. दोन गुंठेतील ऊस फस्त केला. त्याचबरोबर खोडवे व लावण तुडवून टाकली. दोन दिवसापुर्वी हत्तीचा कळप प्रकाश शिंदे यांच्या शेतात होता. शेतातील मका या कळपाने फस्त केला. याबाबत वनविभागाला कुंभार व शिंदे यांनी कल्पना दिली. वनविभागाचे पथक या परिसरात दाखल झाले आहे. त्यांनी कळपाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण कळपातील हत्तींनी त्यांना दाद दिली नाही. निवांतपणे कळप या परिसरातून जंगलाच्या दिशेन गेल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

पेरणोलीच्या शिवारात हत्ती 
आज सकाळी पेरणोलीच्या शिवारात दोन हत्ती आल्याची बातमी गावात पसरली. कुरकुंदेश्‍वर देवस्थान परिसरात हत्ती असल्याचे सांगण्यात येत होते. शेताकडे जाताना काळजी घेण्याचे आवाहन ग्रामसंस्कार वाहिनीवर करण्यात येत होते. 

शेती पंपांना दिवसा वीज द्या 
रात्रीच्या वेळी हत्ती शेतात येत असल्याने उसाला पाणी पाजणे शेतकऱ्यांना अडचणीचे झाले आहे. यामुळे महावितरणने पेरणोली, वेळवट्टी व गवसे परिसरात कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
 
Web Title: Kolhapur News Elephant seen in Ajara Taluka

टॅग्स