अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आजपासून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

कोल्हापूर - केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार उद्यापासून (ता. ३) अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालये सज्ज असून वितरण, संकलन, उद्‌बोधन व तक्रार निवारण केंद्रांचे नियोजन केले आहे. या प्रक्रियेचे मुख्य केंद्र शिवाजी पेठेतील न्यू कॉलेज असणार आहे.

कोल्हापूर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (खरी कॉर्नर), स. म. लोहिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (सिद्धाळा गार्डन परिसर), कॉमर्स कॉलेज (आझाद चौक), कमला महाविद्यालय (राजारामपुरी पहिली गल्ली), विवेकानंद महाविद्यालय (ताराबाई पार्क), महावीर महाविद्यालय (न्यू पॅलेस परिसर) ही वितरण केंद्रे आहेत.  महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (शिवाजी पेठ), प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (सिद्धाळा गार्डन परिसर), यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (केएमसी, गंगावेस), गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय (हुतात्मा पार्क परिसर), राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय (कदमवाडी), न्यू मॉडेल इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज (ताराबाई पार्क), शहाजी छत्रपती महाविद्यालय (दसरा चौक) ही संकलन केंद्रे असून, कमला महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय व कॉमर्स कॉलेज ही तक्रार निवारण केंद्रे आहेत.

प्रवेश अर्ज असे -
विज्ञान - पांढरा
कला - पिवळा (मराठी माध्यम), गुलाबी (इंग्रजी माध्यम)
वाणिज्य - हिरवा (मराठी माध्यम), निळा (इंग्रजी माध्यम)
प्रवेश अर्ज शुल्क प्रत्येकी ७० रुपये

Web Title: kolhapur news eleventh admission process today