अभियांत्रिकी विद्यार्थ्याची रेल्वेखाली आत्महत्या

अभियांत्रिकी विद्यार्थ्याची रेल्वेखाली आत्महत्या

कोल्हापूर - ‘आजचा पेपर अवघड गेला, पेपरचा त्रास सहन न झाल्याने मला हा मार्ग निवडावा लागला, तरी मला माफ करा’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. राहुल भैरवनाथ पारेकर (वय २५, रा. धडकवस्ती, पांगरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. याची नोंद रेल्वे पोलिसांत दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पांगरे (ता. करमाळा) येथील राहुल पारेकर अभियांत्रिकी शिक्षणासाठी कोल्हापुरात आला. येथील खासगी शिक्षण संस्थेत तो बी.ई.च्या चौथ्या वर्षात शिकत होता. तळसंदे येथे तो कॉटबेसिस रूमवर मित्र सुहास पाटील याच्यासोबत राहत होता. त्यांची सध्या दुसऱ्या सत्राची परीक्षा सुरू आहे. परीक्षेहून तो काल घरी आला. रात्री नऊच्या सुमारास त्याने मित्र सुहासला, ‘मेसमधून डबा आला तर काढून ठेव, गावाकडून बॅंकेचे चेकबुक येणार आहे, कोल्हापुरात जाऊन घेऊन येतो’ असे सांगून तो कोल्हापुरात आला. त्याने टेंबलाईवाडी उड्डाण पुलाजवळील रेल्वे रूळावर आत्महत्या केली. 

सकाळी साडेसातच्या सुमारास महालक्ष्मी एक्‍स्प्रेसच्या चालकाला तरुणाने रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. सहायक पोलिस निरीक्षक समाधान पवार, हवालदार सुनील नीळकंठ आणि पोलिस नाईक सदा पाटील घटनास्थळी दाखल झाले. मृत तरुणाच्या पॅंन्टच्या खिशात मोबाईल संच, पैसे, ओळखपत्र, एटीएमसह कागदपत्रे आणि आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी असलेले पाकीट सापडले. 

चिठ्ठीवर त्याने भावाचा मोबाईल नंबर लिहला होता. पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत राहुल घरी न आल्याने त्याचा मित्र सुहास हा त्याच्या मोबाईलवर सातत्याने संपर्क साधत होता. त्याच्या क्रमांकावरही पोलिसांनी संपर्क साधला. तसा तो घटनास्थळी दाखल झाला. त्याने मृतदेह ओळखला. त्यानंतर पंचनामा करून सीपीआरमध्ये मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. त्याच्या मागे मोठा भाऊ, बहीण, आई-वडील असा परिवार आहे.

आजचा पेपर अवघड गेला...
आत्महत्येपूर्वी राहुलने लिहून ठेवलेली चिठ्ठी त्याच्या खिशात सापडली. त्याचे स्वतःचे नाव, पत्ता आणि मोठ्या भावाचा मोबाईल नंबरने त्याची सुरवात केली होती. त्यात ‘आजचा पेपर अवघड गेल्यामुळे मी आत्महत्या करत आहे. पेपरचा त्रास सहन न झाल्याने मला हा मार्ग निवडावा लागला. तरी मला माफ करा, यासाठी कोणीही जबाबदार नाही’ असा मजकूर लिहिला होता.

दोन वर्षांपूर्वीही झाला होता गायब
दोन वर्षांपूर्वीही दिलेल्या परीक्षेत त्याला पेपर अवघड गेले होते. त्याच्यावर मानसिक दडपण आले होते. त्यामुळे तो अचानक दोन दिवस गायब झाला होता. त्याची शोधाशोध मित्र, शिक्षक व नातेवाइकांना करावी लागली होती, अशी चर्चा सीपीआर शवविच्छेदन विभागाच्या दारात सुरू होती.

आत्महत्येची चिठ्ठी ‘व्हायरल’

सरकारी सेवेतील तरुणाने केलेल्या आत्महत्येची चिठ्ठी सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाली. एका नेत्याच्या कट्टर समर्थकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संदर्भ चिठ्ठीत आहे; त्यामुळे आत्महत्येबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. चिठ्ठी कोणाची, कोणी व्हायरल केली, यांवर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.

चिठ्ठीत तो असंही म्हणतो...
आत्महत्येचा निर्णय घेताना मला आई, पत्नी व मुलांची आठवण येत होती; पण मला हे सहन होईना. त्रासाला कंटाळून मी जीवन संपवत आहे. आईचा सांभाळ व्यवस्थित कर, तू हे काम करावेस अशी माझी इच्छा आहे. सर्व मित्रांना ‘ऑल दि बेस्ट’ अशा शुभेच्छाही दिल्या.

दरम्यान, संबंधित पोलिस ठाण्यात याबाबत माहिती घेतली असता एक व्यक्ती द्रव पिऊन मृत झाल्याची नोंद आहे; मात्र त्याबाबत त्यांच्या नातेवाइकांसह इतर कोणाची कसलीही तक्रार नाही. त्या व्यक्तीकडे कोणतीही चिठ्ठी मिळालेली नाही. सरकारी व खासगी रुग्णालयात त्यांनी उपचार घेतल्याचेही पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. कोणी तक्रार दिल्यास, त्यानेच लिहिलेली चिठ्ठी असल्यास दखल घेऊ, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित तरुण एका साखर कारखान्याला लागून असलेल्या गावातील आहे. त्याने तीन दिवसांपूर्वी द्रव प्याले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. संबंधित तरुणाने लिहिलेली  चिठ्ठी सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाली. त्यात नेत्याच्या कट्टर समर्थकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. हा तरुण ज्या ठिकाणी नोकरी करीत होता, तेथील संदर्भ आहेत. चिठ्ठीत नेत्यांबाबत घडलेल्या किश्‍शांचाही संदर्भ आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com