‘करमणूक कर’ विभाग होणार बंद

लुमाकांत नलवडे
गुरुवार, 1 जून 2017

कोल्हापूर - देशभर जीएसटी प्रणाली लागू होत असल्यामुळे महसूल मधील महत्त्वाचा करमणूक कर विभाग १ जूनपासून बंद होत आहे. या विभागातील अधिकारी कर्मचारी इतरत्र मुरविण्यासाठी महसूल विभागाकडून तयारी सुरू झाली आहे. वेगवेगळ्या कर प्रणालीमुळे महसूलमध्ये करमणूक कर विभागाला अनन्यसाधारण महत्त्व होते. 

करमणूक कर जमा करण्यासाठी त्यांचे ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी अनेक घडामोडी होत होत्या. टार्गेट पूर्ण करणे हा विषय ही चर्चेचा होत होता. केबल नेटवर्कची वसुली, परवाना नूतनीकरण यासह अनेक विषय या कार्यालयाकडे असायचे, मात्र देशभर जीएसटी (गुडस्‌ ॲण्ड सर्व्हीस टॅक्‍स) ची अंमलबजावणी होत आहे. 

यात करमणूक कराऐवजी सेवा कर आकारला जाणार आहे. परिणामी करमणूक कर जमा करण्याचे कामच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे महसूलमधील महत्त्वाचा असा करमणूक कर विभागाच कायमचा बंद होणार आहे.  या विभागातील कर्मचारी-अधिकारी अन्य कोणत्या विभागात मुरविता येतील, याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. 

जिल्ह्यातील करमणूक कर विभागात सध्या किमान पंधरा अधिकारी-कर्मचारी काम करीत आहेत. या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना इतर विभागात सहभागी करण्यासाठी त्यांची ‘लिस्ट’ आज तयार करण्यात आली आहे. 

३१ मेनंतर हा विभाग बंद होण्याची शक्‍यता आहे. काहीच नाही झाले तरीही त्यांना कोणतेच काम उरलेले असणार नाही. यानंतर महिन्याभरात हा विभाग कायमचा बंद होण्याची शक्‍यता आहे, मात्र एक जूनपासूनच हा विभाग बंद होणार, असे संकेत महसूल विभागाला मिळालेले आहेत, त्याच तयारीने अधिकारी कर्मचारी मुरविण्याचा प्रक्रियेत लागले आहेत.

रिक्त जागांवर मुरविणार
जीएसटी प्रमाणाली मुळे करमणूक कर विभाग बंद होणार आहे. तेथील कर्मचारी इतरत्र मुरविणे आवश्‍यक असणार आहे. जेथे रिक्त जागा आहेत, तेथे त्यांचे प्रयोजन करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Web Title: kolhapur news entertainment tax department close