उद्योजकाच्या अपहरणामागे इचलकरंजीच्या डॉनचा हात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

इचलकरंजी - येथील उद्योजक अपहरण प्रकरणात शहरातील संग्राम चौकातील पाच आणि सांगली जिल्ह्यातील पलूस येथील दोन शॉर्पशूटरचा समावेश असल्याचे महत्त्वाचे धागेदोरे इचलकरंजी पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणामागे शहरात डॉन समजल्या जाणाऱ्या गुन्हेगाराचा हात असल्याचे प्राथमिक तपासामध्ये पुढे आले आहे. 

इचलकरंजी - येथील उद्योजक अपहरण प्रकरणात शहरातील संग्राम चौकातील पाच आणि सांगली जिल्ह्यातील पलूस येथील दोन शॉर्पशूटरचा समावेश असल्याचे महत्त्वाचे धागेदोरे इचलकरंजी पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणामागे शहरात डॉन समजल्या जाणाऱ्या गुन्हेगाराचा हात असल्याचे प्राथमिक तपासामध्ये पुढे आले आहे. 

सातजण ताब्यात अपहरण प्रकरणात पडद्यामागे राहून अन्य गुन्हेगार क्षेत्रातील काहींना पुढे केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. त्या दृष्टीने केलेल्या तपासामध्ये पोलिसांना सातजणांची नावे पुढे आली आहेत. रात्री उशिरा तपासी पथकांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. यांमध्ये पलूस व इचलकरंजीमधील संग्राम चौकातील पाच अशा सातजणांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
तपासासाठी पोलिसांनी वेगवेगळी तीन पथके तैनात केली आहेत.

यांमध्ये कोल्हापूर स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखा, इचलकरंजी स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि गावभाग पोलिस ठाणे यांचे प्रत्येकी एक पथक पहाटेपासून विविध दिशांनी तपास करीत होते. ज्या मोटारीतून कापड उद्योजकांचे अपहरण करण्यात आले, त्या वाहन चालकाच्या मोबाईलवर शहापूर चौक, हातकणंगले येथील रघू-जानकी मंगल कार्यालय आणि हातकणंगले-बाहुबली मार्गावर कॉल आले होते. त्या कॉलच्या सायबर सेलच्या मदतीने मोबाईल लोकेशनवरून अपहरणकर्त्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

संग्राम चौकातील धागेदोऱ्यांवरून पोलिसांनी शहरात यापूर्वी डॉन म्हणून मिरविलेल्या काहींच्या गुन्हेगारीने पुन्हा अशा क्षेत्रात डोके वर काढले का, यासाठी महत्त्वपूर्ण माहिती तपासत आहेत. पोलिसांनी उद्योगक्षेत्रात गुन्हेगारीचे वर्चस्व वाढू नये म्हणून मोकासारख्या कारवाईने अनेकाच्या मुसक्‍या आवळण्याचे काम सुरू केले आहे. या रडारवर आणखीन काहीजण असून डॉन समजल्या जाणाऱ्या एकावर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे या गुन्ह्यातून महत्त्वाचे धागेदोरे शोधण्याचा चंग पोलिस अधिकाऱ्यांनी बांधला असल्याचे समजते. 

अपहरण प्रकरणातील गुन्हेगारांच्या प्रवृत्तीवरून शहरातील उद्योगधंद्यांत पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे; मात्र या प्रकरणाच्या तळाशी जाऊन गुन्हेगारांच्या मुसक्‍या लवकरच आवळू.
- श्रीनिवास घाडगे, 

अपर पोलिस अधीक्षक

संबंधीत बातम्या -

Web Title: Kolhapur News Entrepreneur kidnapping by Ichalkaranji Don