एक्‍स-रे यंत्रात कोल्हापूरात आठ रुग्णालयांत त्रुटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - एक्‍स-रे, कॅथलॅब यांसारख्या वैद्यकीय चाचणी उपकरणांतून बाहेर पडणारी क्ष-किरणे मानवी आरोग्याला घातक ठरतात. त्यामुळे अशा यंत्रांची गुणवत्ता तपासून घ्यावी लागते. त्यासाठी केंद्रीय अणुऊर्जा परिषदेचे परवाने घेऊनच अशी उपकरणे हाताळणे आवश्‍यक आहे. खासगी रुग्णालयांत परवाना नसताना अशी यंत्रे वापरात असणाऱ्या आठ रुग्णालयांना केंद्रीय अणुऊर्जा नियामक परिषदेच्या पथकाने नोटीस बजावल्या आहेत.

कोल्हापूर - एक्‍स-रे, कॅथलॅब यांसारख्या वैद्यकीय चाचणी उपकरणांतून बाहेर पडणारी क्ष-किरणे मानवी आरोग्याला घातक ठरतात. त्यामुळे अशा यंत्रांची गुणवत्ता तपासून घ्यावी लागते. त्यासाठी केंद्रीय अणुऊर्जा परिषदेचे परवाने घेऊनच अशी उपकरणे हाताळणे आवश्‍यक आहे. खासगी रुग्णालयांत परवाना नसताना अशी यंत्रे वापरात असणाऱ्या आठ रुग्णालयांना केंद्रीय अणुऊर्जा नियामक परिषदेच्या पथकाने नोटीस बजावल्या आहेत.

डॉ. आरती कुलकर्णी, जी. शिवरामन, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने शहरातील विविध दवाखान्यांना भेटी देत डेंटल, मशिन लिथोट्रीप्सी, रेडिओग्राफी, एक्‍स-रे मशिन, कॅथलॅब, डेंटल अशा उपकरणांचे किरणोत्सर्ग करणारी यंत्राची तंदुरस्ती तसेच परवाने तपासले.  यात शासकीय व खासगी रुग्णालयातील एकूण बारा यंत्रे सील केली आहेत.

एक्‍स-रे यंत्रे वापराचे परिषदेने काही नियम घालून दिले आहेत. या यंत्रातून बाहेर पडणारा किरणोत्सर्ग धोकादायक ठरू नये यासाठी योग्य त्या क्षमतेचे यंत्र बसविणे, ते तपासून घेणे, पुरेक्षा क्षमतेची खोली, प्रशिक्षित ऑपरेटर या बाबी पथकाने तपासल्या. यात दहा रुग्णालयांत अनियमितता आढळली. किरणोत्सर्गाशी संबंधित उपकरणे वापरण्यासाठी ऑनलाईन कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी परिषदेने यापूर्वी माहिती दिली आहे तसेच ऑनलाईन पद्धतीन परवाने घेणे कागदपत्रांची पूर्तता करणेही शक्‍य केले आहे. तरीही हॉिस्पटलकडून परवानग्या मिळवून घेण्यासाठी खासगी एजन्सीचा आधार घेतला. यात खासगी एजन्सीकडून रुग्णालयाकडून मोबदला घेण्यात आला. प्रत्यक्ष ऑनलाईन प्रक्रियेत रुग्णालयाची जी माहिती भरली तीच चुकीची भरली गेली त्यामुळे काही हॉिस्पटलला परवानगी मिळालेली नाही, असे पथकाने केलेल्या तपासणीत उघड झाले आहे.

शहरातील आठ रुग्णालयांतील यंत्रे सील केली गेली. उर्वरित रुग्णालयांची तपासणी टप्प्यानेही होणार आहे तत्पूर्वी ऑनलाईन पद्धतीने परवाना कसा घ्यावा यासंदर्भात काही डॉक्‍टरांनी पथकाची भेट घेऊन माहिती घेतली आहे.

एक्‍स-रे मशीनमधून बाहेर पडणारी किरणे तेथे काम करणाऱ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. क्ष किरणोत्सर्गाशी संबंधित मशीन हृदयरोग, अस्थिव्यंग, सिटीस्कॅन, कॅथलॅब, डेंटल मशिन, लिथोस्कोपी मशिन आहे. त्यांचे परवाने अणुउर्जा नियामक परिषदेकडून घ्यावी लागतात. कोल्हापुरात असे परवाने घेण्यात टाळाटाळ केल्याचे दिसते. परवाने नसलेली मशीन सील केली आहेत. तसेच संबंधित कागदपत्रांची पूर्ततः करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत.
- आरती कुलकर्णी
    वैज्ञानिक अधिकारी

Web Title: kolhapur news errors in X-ray machine