राधानगरी अभयारण्याच्या संवेदनशील परिसरातच उत्खनन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

राशिवडे बुद्रुक - एकीकडे जंगल संरक्षणावर कोट्यवधीचा खर्च आणि कायदे कडक केले असताना राधानगरी अभयारण्यासारख्या संवेदनशील परिसरातच उत्खनन सापडते, तेही वन्यजीव कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर ही गंभीर बाब पुढे आली आहे.

राशिवडे बुद्रुक - एकीकडे जंगल संरक्षणावर कोट्यवधीचा खर्च आणि कायदे कडक केले असताना राधानगरी अभयारण्यासारख्या संवेदनशील परिसरातच उत्खनन सापडते, तेही वन्यजीव कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर ही गंभीर बाब पुढे आली आहे.

नुकताच या उत्खननावर जिल्हाधिकारी कार्यालयातील खणीकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांना छापा टाकला. यामध्ये राधानगरी-भुदरगड तालुक्‍यातील काही बड्यांचा हात असल्याची चर्चा होत आहे. वृक्षतोड आणि खणण याकडे डोळेझाक का झाली, याच्या चौकशीची आता मागणी होत आहे.

राधानगरी अभयारण्यात विनापरवाना कुणी पाय टाकला तरी वनखाते कारवाई करते. स्थानिकांना वाळक्‍या लाकडाला जरी हात लावला तरी डोळे वटारले जातात. जंगलात वाहन फिरवणे, लाकूड तोडणे किंवा उकरणे ही गंभीर बाब समजली जाते. असे असतानाही या अभयारण्याच्या कक्षेत व नियमित हद्दीजवळ वर्षापासून विनापरवाना बॉक्‍साईटचे उत्खनन सुरू होते आणि याचा थांगपत्ताही वन्यलीव विभागाला नसावा, ही आश्‍चर्याची गोष्ट घडलेली आहे.

राधानगरी वन्यजीव क्षेत्रातील पडळी बीटमध्ये जोंधळेवाडी, मिसाळवाडीच्या मालकी क्षेत्रामध्ये बॉक्‍साईटचे उत्खनन सुरू होते. यासाठी वृक्षतोड करून उत्खनन सुरू असल्याची माहिती आता पुढे येत आहे. या परिसरासाठी वनखात्याचा स्वतंत्र कर्मचारी नियुक्त आहे. दर दिवशी त्याचा फेरी त्याच्या कार्यक्षेत्रात असने बंधनकारक असताना मोठमोठ्या यंत्रांद्वारे सुरु असलेले हे उत्खनन दिसून आले नाही, असे म्हणणेही मूर्खपणाचे आहे.

गेल्याच आठवड्यात खणीकर्म विभागाने यावर छापा टाकला. यात सातशे टन बॉक्‍साईट जप्त केले. मग याचा जराही सुगावा तालुक्‍यातील अधिकाऱ्यांना का नव्हता, हा मुद्दा अधोरेखीत होत आहे. छापा पडल्यानंतर याची आता चर्चा रंगली आहे.

अधिकारीही अनभिज्ञ
याबाबत येथील सहायक वनसंरक्षक ए. डी. पाटील यांना विचारले असता सुरु असलेले उत्खनन व गेल्या आठवड्यात पडलेल्या छाप्याची आपल्याला काहीच माहिती नाही. वनक्षेत्रपालांना विचारून सांगतो, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Excavation in the sensitive area of Radhanagari Wildlife Sanctuary