शेतकरी विरोधात बोलणारे ठरले 'लक्ष्य'

राजकुमार चौगुले
गुरुवार, 1 जून 2017

शेतकरी संपाबाबत सोशल मिडीया ही 'तापला'

कोल्हापूर : शेतकरी संपाच्या बातम्या जस जशा सोशल मिडीयातून व्हायरल होवू लागल्या तशी या संपाचे गांभीर्य शेतकऱ्यासह नागरिकांच्याही लक्षात येवू लागले.

फेसबूक, व्हॉटसअपच्या विविध ग्रुप मधून प्रत्येक भागात घडलेल्या घटनांचे तपशील येवून पडू लागताच शेतकऱ्यांनी संप केला आहे, आणि तो अस्तीत्वासाठी आहे हे लोकांच्या लक्षात येताच याबाबतच्या कॉमेंटसने सोशल मिडीया अक्षरश: व्यापून गेला.

व्हॉटसअपच्या प्रत्येक शेतकरी ग्रुपने संपात भाग घेतलेली छायाचित्रे व्हायरल केली. यामुळे आजचा सोशल मिडीया हा पहिल्यांचा शेतकरी संपाच्या अपडेटनी भरुन गेल्याचे चित्र होते. या अपडेट टाकताना प्रत्येकाने शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका मांडली. एखाद्या व्यक्तीने या संपाच्या विरोधात कमेंटस केल्यानंतर त्याच्या विरोधात शेकडो कमेंटस पास होत होत्या. ज्या व्यक्तींनी सहज म्हणून या संपाच्या विरोधात भाष्य करणारी पोस्ट टाकली. त्यांना प्रतिक्रीयेच्या माध्यमातून कडा विरोध सहन करावा लागला. शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींना जहरी टीका सहन करावी लागली.

पोस्ट टाकताना गांभिर्य नसलेल्या व्यक्तींना या प्रतिक्रीया पाहून आपल्या पोस्ट मागे घ्याव्या लागल्या. अनेकांनी माफीही मागितली. ज्या ज्या व्यक्तींनी या पोस्ट केल्या. त्यां व्यक्ती कोणाशी संबधित याची माहितीही देण्यात येत होती. यामुळे शेतकऱ्यांना भलेबुरे म्हणनाऱ्या व्यक्तींना चांगलाच रोष पत्कारावा लागला. गेल्या काही दिवसात पहिल्यांदाच या प्रश्‍नाने सोशल मिडीया तापल्याचे दृष्य आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'बीड-परळी रेल्वेच्या कामाला तीन जूनपासून होणार सुरुवात'
नाशिक : दिंडोरी तालुक्यात दूध, आंब्याचे ट्रक अडविले​
पालकांपासून बचाव करण्यासाठी तावडेंभोवती 'सुरक्षा कडे'
एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​
शेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा: रामदास फुटाणे
सोलापूरात फुले रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा संपात सहभाग
शेतकरी संपावर अन् सरकार शांत कसे?: धनंजय मुंडे
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी
अभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला

Web Title: kolhapur news farmer strike and social media