जागतिक दुग्ध दिनादिवशीच चुकली 'पान्ह्या'ची वेळ...

राजकुमार चौगुले
गुरुवार, 1 जून 2017

ऐन वेळी धारा काढण्याची वेळ एक ते दीड तासाने आत आल्याने याचा परिणाम मात्र दुध उत्पादक शेतकऱ्यांवर झाला. जनावरांनी धारा काढायची वेळ ठरलेली असते. मात्र या संपामुळे ही वेळ एक ते दीड तासाने लवकर आल्याने शेतकऱ्यांच्या वेळापत्रकात बदल झाला. वेळेच्या अगोदर धारा काढाव्या लागत असल्याने अनेक जनावरांना लवकर पान्हा ही फुटला नाही.

कोल्हापूर : कोट्‌यावधी नागरिकांची दुधाची गरज पूर्ण करणाऱ्या जगातील दुध उत्पादकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून एक जून हा जागतिक दुग्ध दिवस म्हणून साजरा केला जातो. पण राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मात्र ऐन उत्सवादिवशीच दुध पट्ट्यात अस्वस्थता पसरली. 

शेतकऱ्यांनी संप केल्याने त्याचा परिणाम दुध संकलनावरही झाला. पश्‍चिम महाराष्ट्रात काही दुध संस्थानी संकलन पूर्ण बंद ठेवले तर काही दुध संस्थांनी शेतकऱ्यांना आदल्या दिवशी रात्रीच तातडीच्या सुचना देवून धारा लवकर काढण्याचे आवाहन केले. ज्या ज्या गावांत सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान दुध संकलन करुन दुधाच्या गाड्या बाहेर पडत होत्या. त्या गावांमध्ये सकाळी आठच्या आतच दुध गावातून बाहेर पाठविण्यासाठी दुध संस्थांची लगबग सुरु होती.

ऐन वेळी धारा काढण्याची वेळ एक ते दीड तासाने आत आल्याने याचा परिणाम मात्र दुध उत्पादक शेतकऱ्यांवर झाला. जनावरांनी धारा काढायची वेळ ठरलेली असते. मात्र या संपामुळे ही वेळ एक ते दीड तासाने लवकर आल्याने शेतकऱ्यांच्या वेळापत्रकात बदल झाला. वेळेच्या अगोदर धारा काढाव्या लागत असल्याने अनेक जनावरांना लवकर पान्हा ही फुटला नाही. यामुळे ''कासे"त नेहमीपेक्षा अधिक वेळ शेतकऱ्यांना द्यावा लागला. यामुळे अगोदरच उशिर आणि धार निघण्यातही उशीर झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला. अनेक शेतकऱ्यांना तर धावत पळत जावूनच दुध संस्थांना वेळेत दुध पुरवठा करावा लागला.

स्थानिक पातळीवरच निर्णय
या संपाबाबत दुध संघांमध्येही सभ्रमावस्था होती. यामुळे बहुतांशी दुध संघांनी याबाबतच्या वेगळ्या सूचना कोणत्याही दुग्ध संस्थांना केल्या नाहीत. यामुळे गावागावातील दुध संस्थांनी शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये म्हणून स्थानिक पातळीवर निर्णय घेवून गावातून लवकरात लवकर दुध बाहेर पाठविण्याचे नियोजन केले होते. गुरुवारी (ता.1) दुपारपर्यंत मात्र दुग्ध संकलनाबाबत संघाकडून कोणत्याही सूचना न आल्याचे दुध संस्थांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​
शेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा: रामदास फुटाणे
सोलापूरात फुले रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा संपात सहभाग
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
'आयटी'तील तरुणीची गोळ्या घालून हत्या; प्रियकरानेच हत्या केल्याचा संशय​
प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी
जनावरे खरेदी-विक्रीच्या निर्णयात हस्तक्षेप नाही- केरळ उच्च न्यायालय​
मराठवाड्यात दीडशे दिवसांत 361 शेतकरी आत्महत्या​
अभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला

Web Title: Kolhapur news farmer strike in Maharashtra impacts milk production