अमृत योजनेस वारणा काठातील गावातून विरोध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

दानोळी - इचलकरंजीची अमृत योजना ही वारणा काठ व शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. तसेच प्रशासनाने 2 मे रोजी वापरलेला दबाव तंत्र व दाखल केलेले खोटे गुन्हे याच्या विरोधात संपूर्ण वारणा काठावर साखळी उपोषण करण्यात येत आहे. या आंदोलनास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. 

छत्रपती शिवाजी चौकात आज सकाळपासून वारणा बचाव कृती समिती व ग्रामस्थांनी उपोषणास सुरवात केली. यामध्ये वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे, उपाध्यक्ष केशव राऊत, सचिव मानाजीराव भोसले, सर्जेराव शिंदे, रावसाहेब भिलवडे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे, पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे आदींनी सहभाग घेतला.

उपोषणस्थळी खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, आमदार सुजित मिणचेकर, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, शिरोळ पंचायत सभापती मीनाक्षी कुरडे, सावकर मादनाईक, आदींनी भेट देवून आंदोलनास पाठींबा दिला.

हातकणंगले, आळते गावचा पाठींबा
हातकणंगले व आळते गावाने या साखळी उपोषणास व आंदोलनास पाठींबा दिला आहे. गाव बंद ठेवून योजना रद्द करण्याची मागणी केली आहे. उपोषणातही सहभागी होणार आहेत. 

उद्या कोथळीत उपोषण
संपूर्ण वारणा काठ व शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात साखळी उपोषण होणार आहे. उद्या (ता.18) कोथळी (ता. शिरोळ) येथे उपोषण होणार आहे.

Web Title: Kolhapur News farmers oppose to Amrut Yojana