चित्रपट महामंडळाच्या दोषींवर कारवाई का नाही?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात सुमारे पाऊण कोटींचा गैरव्यवहार करणाऱ्यांवर अद्यापही कारवाई का केली नाही, असा संतप्त सवाल चित्रपट-नाट्य व्यावसायिक कृती समितीने उपस्थित केला. दोषींना पाठीशी घालणाऱ्या आणि गेल्या तीन वर्षांत एकही सर्वसाधारण सभा न घेतलेल्या विद्यमान कार्यकारिणीविरोधात प्रसंगी लढा उभारला जाईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. कुलकर्णी म्हणाले, ‘‘सन २०१० ते २०१५ या काळात गैरव्यवहार करणाऱ्यांवर धर्मादाय आयुक्तांनी दहा लाख ७८ हजार रुपये इतक्‍या दंडाची कारवाई केली आहे. मात्र, त्यात संपूर्ण कार्यकारिणीला जबाबदार धरले आहे. विद्यमान कार्यकारिणीवरही एक लाख इतक्‍या रकमेच्या दंडाची कारवाई केली आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर विद्यमान कार्यकारिणीने तत्काळ दोषींवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्या सभासदत्व रद्दची मागणीही केली आहे.’’

संबंधित कालावधीत सुमारे पाऊण कोटीचा गैरव्यवहार होऊनही दंडाची रक्कम नगण्य आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांकडे पुन्हा याबाबतचे निवेदन दिले जाईल. लवकरात लवकर विद्यमान कार्यकारिणीने सकारात्मक कार्यवाही केली नाही, तर मात्र महामंडळाविरोधात आंदोलन तीव्र केले जाईल, असेही श्री. कुलकर्णी म्हणाले. या वेळी समितीचे उपाध्यक्ष सुरेंद्र पन्हाळकर, कार्यवाह अर्जुन नलवडे, बाबा पार्टे, सुरेखा शहा, छाया सांगावकर, अरुण चोपदार, सदानंद सूर्यवंशी, अशोक जाधव, तानाजी पाटील आदी उपस्थित होते. 

सभासद वाढले...
गेल्या तीन वर्षांत सभासद वाढीवर महामंडळाने अधिक भर दिला असून, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सभासद वाढविणे चुकीचे आहे. संबंधितांकडून आवश्‍यक सर्व कागदपत्रे तपासूनच सभासदत्व दिले जावे, असे या वेळी सुरेखा शहा म्हणाल्या.

Web Title: Kolhapur News Film corporation Fraud Bhalchadra Kulkarni Press