आजऱ्यात गवत भरलेल्या ट्रॅक्‍टरला आग 

रणजित कालेकर
सोमवार, 21 मे 2018

आजरा - येथील महाजन गल्लीमध्ये गवताचे भारे भरलेल्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीला लागलेल्या आगीत गवतांचे भारे जळून गेले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराला वीज तारांचा स्पर्श होवून ही आग लागली. आगीमध्ये अंदाजे 50 हजारांचे नुकसान झाले. चालकाने प्रसंगावधान दाखवून ट्रॉलीतील गवत खाली केले. नागरीक व तरुणांनी तातडीने आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला

दिलावर पटेल यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी भटवाडी येथे गवत कापून टाकले होते. पटेल यांनी संतोष बागवे यांचा ट्रॅक्‍टर भाड्याने घेतला. या ट्रॅक्‍टरमध्ये (एम एच 09- सीके 5923) गवत भरले. ते आजऱ्यात दर्गा गल्ली येथे न्यावयाचे होते. ट्रॅक्‍टर महाजन गल्लीत आल्यावर डॉ. दिपक सातोस्कर यांच्या दवाखान्याच्या समोर आला. येथील एका खांबावर लोंबकळत असलेल्या वीजेच्या तारेला गवताचा स्पर्श झाल्याने गवताने पेट घेतला. काही मिनीटातच ट्रॅक्‍टर आगीच्या ज्वाळांनी वेढला गेला. सर्व गल्लीभर धुराचे लोट उठले होते.

ही घटना नागरीकांनी चालक बागवे यांच्या लक्षात आणून दिली. बागवेंनी प्रसंगावधान राखून ट्रॉलीतील गवत रस्त्यावर पलटी केले. तरुणांनी व पादचाऱ्यांनी गवतांच्या भाऱ्यावर पाणी मारून आग विझवली. 

Web Title: Kolhapur News fire to fodder transporting tractor