कोल्हापूर न्यु शाहूपुरीत आगीची घटना, एक म्हैस ठार

निवास चौगले, नितीन जाधव
सोमवार, 19 मार्च 2018

कोल्हापूर - येथील न्यु शाहुपुरीमध्ये घर व गोठ्याला आग लागली. घरगुती गॅस सिलेंडरमधून गळती झाल्याने स्फोट होऊन ही आग लागली. या आगीत घर व गोठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यात एक म्हैस दगावली आहे तर एक गाय जखमी झाली आहे. 

याबाबत घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी की, न्यु शाहुपूरी येथे सिलेंडरमधील गॅसची गळती झाल्याने शरद बनसोडे यांच्या घराला आग लागली. या घरात गोठा असल्याने जनावरांसाठी आणलेले गवत, कोंडा, भुसा आदी खाद्याने पेट घेतला. यामुळे आग भडकली. यात एक म्हैस दगावली तर एक गाय जखमी झाली आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच चार ते पाच अग्निशमनचे बंब घटनास्थळी दाखल झाले.  या आगीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Kolhapur News Fire in New Shahupuri one Buffalow dead