‘रोटरी-इनरव्हिल’तर्फे पाच हॅप्पी स्कूल

संभाजी गंडमाळे
गुरुवार, 7 जून 2018

कोल्हापूर - रोटरी क्‍लबच्या ‘टीच’ उपक्रमांतर्गत यंदाही जिल्ह्यातील महापालिका व जिल्हा परिषदेच्या किमान पाच शाळा हॅप्पी स्कूल होणार आहेत. इनरव्हील क्‍लबचे या उपक्रमाला सहकार्य मिळत असून गेल्या वर्षी पाच शाळा हॅप्पी स्कूल झाल्या आणि पटसंख्या वाढीसाठी त्याची मदत होत आहे. या उपक्रमांतर्गत शाळांच्या गरजेनुसार एका शाळेवर पाच लाखांपर्यंतचा खर्च केला जातो. 

- काय आहे ‘टीच’ ?
टीचर ट्रेनिंग (टी), ई-लर्निंग (ई), ॲडल्ट लिटरसी (ए), चाईल्ड डेव्हलपमेंट (सी) आणि हॅप्पी स्कूल (एच) अशा पाच विभागात ‘टीच’ उपक्रमातून काम चालते. सरकारी शाळांमध्ये आमूलाग्र बदल करून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण घेता यावे, या उद्देशाने हा उपक्रम चालतो. त्यासाठी आवश्‍यक खर्च रोटरी व इनरव्हिल क्‍लब करतात. या उपक्रमांतर्गत यंदा जिल्हा परिषदेच्या दहा हजार शिक्षकांना टेक्‍नोसेव्ही बनवण्याचे तसेच स्पोकन इंग्लिशचे प्रशिक्षण दिले गेले. शाळांना ई-लर्निंगचे एक किट ज्यावेळी शासनाकडून मिळते. त्यावेळी या उपक्रमातून आणखी एक किट संबंधित शाळेला दिले जाते. शाळा ‘हॅप्पी स्कूल’ करताना संबंधित शाळेच्या रंगरंगोटीसह सर्व आवश्‍यक भौतिक सुविधा शाळेत उपलब्ध केल्या जातात. त्यातही प्रामुख्याने मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्यावर अधिक भर दिला जातो. 

- आधार ‘सीएसआर’चा
सरकारी शाळांसाठी आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीचाही आधार मिळाला आहे. सुमारे साडेदहा कोटी इतक्‍या निधीतून जि.प.च्या शाळांत विविध सुविधा दिल्या आहेत. येत्या शैक्षणिक वर्षातही हा निधी अधिक कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केले जातील. 

- शिक्षकांची स्वयंप्रेरणा
भौतिक सुविधांबरोबरच पटसंख्या वाढवण्यात शिक्षकांची स्वयंप्रेरणा महत्त्वाची ठरते आहे. इनोव्हेटीव्ह क्‍लासरूम, डेव्हलपमेंट क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्ह थिंकिंग, क्‍लासरूम गेम असे असंख्य व्हिडिओज्‌ सध्या इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्याचा वापर आता शिक्षक अध्यापनासाठी करू लागले आहेत. विविध पाठांचे ‘पीपीटी’ तयार करून ते एकमेकांना शेअरही केले जाऊ लागले आहेत.

Web Title: Kolhapur News five happy school from Rotary inner wheel