गांजा ओढणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना जामीन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

कोल्हापूर - बागेत खुलेआम गांजा सेवन करणाऱ्या पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना न्यायालयाने जामीन दिला. त्यांची वैद्यकीय तपासणी केली. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, विक्रेत्याचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले.

टाकाळा, माळी कॉलनी येथील बागेत काल दुपारी गांजा सेवन करणारे तिघे तरुण व एका तरुणीला राजारामपुरी पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून १५ ग्रॅमचा गांजा, सिगारेट पाकिटे, लायटर जप्त केला. कारवाई दरम्यान कसबा बावड्यातील एक तरुणी पळून गेली होती. तिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. आज पाच जणांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्यांचे पालकही उपस्थित होते. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

दरम्यान, पोलिसांनी पाचही जणांचे जबाब नोंदविले आहेत. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे.

Web Title: Kolhapur News five students arrested in Ganja case