चला, हॉटेल सयाजीत शुभ आहार घ्यायला...!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

विविध शाकाहारी पदार्थ : लहान मुलांसाठी फ्रेच फ्राईजची डिश; बार्बेक्‍यू नेशनमध्ये आयोजन

विविध शाकाहारी पदार्थ : लहान मुलांसाठी फ्रेच फ्राईजची डिश; बार्बेक्‍यू नेशनमध्ये आयोजन

कोल्हापूर: पाऊस धोधो कोसळत नसला, तरीही श्रावण मासानिमित्त विविध उपवासाचे पदार्थ, तसेच उपवास सोडण्यासाठी वेगवेगळे पदार्थ घरोघरी तयार केले जात आहेत. हवेत पावसाळी "चिल' नसला तरी श्रावणाचा "फील' अशा विविध खाद्यपदार्थांतून येतो आहे; म्हणूनच श्रावणाच्या पृष्ठभूमीवर हॉटेल सयाजीच्या शेफ टीमने "शुभ आहार' ही संकल्पना घेऊन, फूड फेस्टिव्हल आयोजित केला आहे. या फेस्टिव्हलमध्येही अनेक चविष्ट शाकाहारी पदार्थांची रेलचेल आहे. विशेष म्हणजे, खवय्यांसाठी खास लाडूंचे काउंटरही आहे. या काउंटरवर जाऊन तुम्ही बेसनाचे, तिळाचे, रव्याचे, खजुराचे लाडू, मोदक, बर्फीचा फडशा पाडू शकता.

हॉटेल सयाजीत जाताना लहान मुलांनाही बरोबर न्या; कारण लहान मुलांसाठी टीम सयाजीने खास चवीने जिभेवर रेंगाळणारे फ्रेंच फ्राईज तयार केले आहेत. उपवास असणाऱ्या लोकांसाठी "कच्चे केळे की टिक्की', साबुदाणा टिक्की, साबुदाणा खिचडी, स्वीट पोटॅटो टिक्की, बेबी पोटॅटो टूक, व्हेज कोटे, हनी चिली पोटॅटो, व्हेज डंप्लिंग, चीझ बॉल, साबुदाणा वडा, कॅज्युन स्पाईस्ड बनाना मिळेल. लहान मुलांना लाडूच्या काउंटरवर बेसन, मोतीचूर, चिवडा, सुजी, खजूर लाडू मिळतील. तत्पूर्वी, तुम्ही व्हेजमध्ये ग्रीन व्हेल्व्हेट सूप, सीफूड लिमो ग्रास सूप घ्या. नंतर टेबलवर बसून ग्रीन सॅलड, आलू चाट, क्रीमी कुकुंबर (काकडी), व्हेज कालेस्लॉ, गार्लिक मायोनीज, फ्रेश लेट्यूस सॅलड, बार्बेक्‍यू नेशन पास्ता सॅलड, मिक्‍स व्हेज रायता, कर्ड राईस, प्लेन कर्ड हे सॅलडस्‌युक्त पदार्थ भरपूर खा. हॉट व्हेज बुफेत तुम्हाला पनीर रणजितय साही, केशरी केलेयान, सेया मिर्च मसाला, दम के कोफ्ता करी, तवा व्हेज बिर्याणी, आलू अद्रकी, दाल मसाला, दाल महापुख्त कुरेशी, स्टीम राईस, सिंगापुरियन नूडल्स, ऍसॉर्टेड व्हेज विथ ग्रीन थाई करी मिळेल.

मेन कोर्सला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही ब्रंट गार्लिक ग्रील्ड व्हेज, चीसे मशरूम, पनीर पोशिदा टिक्का, कॅज्यून स्पाईसी पोटॅटो, अर्बी पिनट रोल, क्रिस्पी कॉर्न, बार्बेक्‍यु पाईनऍपल हे व्हेज स्टार्टर्स खा. इतकं सगळं खाल्ल्यानंतर मोर्चा सरळ डेझर्टस्‌कडे वळवा. येथे तुम्हाला पीनट ब्राऊनी, व्हाईट चॉकोलेट सफल, चीझ केक, फ्रुट गॉटेक्‍स, अंगुरी गुलाब जामून, बेक्‍ड सरप्राईज, मॅंगो रसमलई, केशरी फिरनी, आईस्किम्स्‌, कलिंगड, टरबुजाच्या फोडी मिळतील. कुल्फी ज्यांना आवडते त्यांना मलई, केसर पिस्ता, पान, प्लम, मॅंगो, ओरिओ कुल्फी मिळेल. डायबेटिस असणाऱ्यांना शुगर फ्री कुल्फी मिळेल.

मेन कोर्स, डेझर्टस्‌, कुल्फीज, फळांच्या फोडी फस्त केल्यानंतर गप्पाटप्पा रंगवीत पान काउंटरवर जाऊन मसाला पान घ्या. अन्य मुखवासही मिळतील. मग चला तर, बार्बेक्‍यू नेशनमध्ये शुभ आहार घ्यायला. शुभ आहार ही संकल्पना साकारण्यासाठी सरव्यवस्थापक पुनीत महाजन, सरव्यवस्थापक (एफ अँड बी) राजेश राधाकृष्णन, शेफ रमेश आडकुरकर, शेफ अत्तार सिंग राणा, कॅप्टन विकास कुमार यांनी परिश्रम घेतले आहेत.

Web Title: kolhapur news food festival in hotel sayaji