आजरा तालुक्यात सुमारे ५० जणांना अन्नातून विषबाधा

अशोक तोरस्कर
शुक्रवार, 25 मे 2018

उत्तूर - होन्याळी (ता. आजरा ) येथील जाधव गल्लीतील अंदाजे पन्नास नागरिकांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या जेवनानंतर सकाळी या नागरिकांना जुलाब व उलट्या सुरु झाल्या. या सर्व रुग्णावर उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्रात समीर तौकरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत. 

गुरुवारी रात्री एका नागरीकांच्या घरी धार्मिक कार्यक्रम होता. यानिमित्य आंबील घुगऱ्यांचा प्रसाद ठेवण्यात आला होता. 
सुमारे 200 नागरिकांनी हा प्रसाद खाल्ला. यापैकी काही नागरिकांना आज सकाळपासून जुलाब उलट्या सुरु झाल्या. रूग्णांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने तीन रुग्णवाहिकेतून पेशंट आणून दाखल केले. यापैकी काही पेशंटना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Kolhapur News food poisoning incident in Ajara Taluka