कोल्हापुरात फुटबॉल फिव्हर

युवराज पाटील
शुक्रवार, 29 जून 2018

कोल्हापूर - कुणी अर्जेंटिना फॅन्स, तर कुणी ब्राझीलचे, कुणाला रोनाल्डाे तर कुणाला मेस्सी आवडतो, नेमारही याच यादीतला. फिफा वर्ल्ड कप फुटबॉल बाद फेरीकडे वाटचाल करत असताना कोल्हापुरातील फॅन्सची इर्षाही टोकाला पोहोचू लागली आहे. रात्री-अपरात्री आवडत्या संघाचा गोल झाला की ‘आऊट’ वाजू लागले आहेत.

कोल्हापूर - कुणी अर्जेंटिना फॅन्स, तर कुणी ब्राझीलचे, कुणाला रोनाल्डाे तर कुणाला मेस्सी आवडतो, नेमारही याच यादीतला. फिफा वर्ल्ड कप फुटबॉल बाद फेरीकडे वाटचाल करत असताना कोल्हापुरातील फॅन्सची इर्षाही टोकाला पोहोचू लागली आहे. रात्री-अपरात्री आवडत्या संघाचा गोल झाला की ‘आऊट’ वाजू लागले आहेत. फुटबॉलच्या चर्चेत रात्रीही रंगू लागल्या आहेत. नॉकआऊट सामन्यांसाठी काही मंडळांनी स्क्रीन लावण्याचे नियोजन केले आहे.

कोल्हापूर आणि फुटबॉल हे समीकरण बनले आहे. सुमारे दोन हजाराहून अधिक जण या खेळाशी जोडले गेले आहेत. तालीम मंडळांची फुटबॉल हंगामात जोरदार ईर्षा असते. 

स्पर्धेच्या निमित्ताने मुख्य रस्ते तसेच गल्लीबोळ विविध देशांच्या टी शर्टने सजले आहेत. कोल्हापुरात पूर्वीपासून ब्राझील आणि अर्जेटिनाचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. गत फुटबॉल स्पर्धेपासून पोर्तुगालच्या ख्रिस्तीयानो रोनाल्डोचे अनेक चाहते झाले. आजही शहरात विशेषतः पेठांच्या भागात रोनाल्डो, मेस्सी आणि नेमारचे कट आउटस्‌ मोठ्या प्रमाणावर झळकले आहेत. 
रात्रीच्या कट्ट्यावर गप्पा केवळ फुटबॉलच्याच आहेत.

तालीम मंडळातील कार्यकर्ते सव्वा अकरापासून टी. व्ही, समोर ठाण मांडतात. सामना सुरू झाली की वेध लागतात गोलचे, एखाद्याच्या संधी हुकली आणि आवडत्या खेळाडूने गोल मारला की सगळेजण उठून उभे राहतात. अथवा मोठ्याने ‘गोल’ अशी साद घालतात. जे विरोधी संघाचे पाठीराखे आहे त्यांना चिडविण्याचा प्रयत्न होतो.

सुरवातीला साखळी फेरीत पाटीराख्यात इर्षा नव्हती. मात्र ब्राझ्रील, अर्जेटिंना, पोर्तुगालने बाद फेरीत प्रवेश केला तशी इर्षो टोकाला पोचली आहे. फ्रान्स तसेच स्पेनही कमाल करू शकतो याची कल्पना संघाच्या पाठीराख्यांना आहे. त्यामुळे ब्राझील, अर्जेंटिना, पोतुर्गाल समर्थकांनो सावधान, असा इशारा दिला जात आहे.

आपल्याच तालमीची टीम
पिवळा निळा, पांढरा निळा, काळा पांढरा, भगवा निळा अशी ड्रेस कोडच्या रंगाची ईर्षा आहे. अमूक एका ड्रेसकोडमधील संघ हा आपलाच संघ आहे, या जाणिवेतून सामने पाहिले जात आहेत.

Web Title: Kolhapur News Football fever in Kolhapur