फुटबॉलच्या सामन्यात हुल्लडबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

कोल्हापूर : खंडोबा तालीम मंडळ (अ) विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ (अ) यांच्यातील उद्या (ता. १७) होणाऱ्या अंतिम सामन्यात हुल्लडबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली. त्यामुळे फुटबॉलला गालबोट लागेल असे वर्तन न करता कोल्हापूरच्या फुटबॉलची परंपरा जोपासा, असे आवाहन संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेचे स्पर्धा संयोजक दिगंबर फराकटे यांनी आज येथे केले. संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित समन्वय बैठकीत ते बोलत होते. कल्याणी हॉलमध्ये बैठक झाली.

श्री. फराकटे म्हणाले, "छत्रपती शाहू स्टेडियममधील उजव्या बाजूच्या खालील व वरील गॅलरीत पाटाकडील, तर डाव्या बाजूच्या गॅलरीत खंडोबाचे समर्थक बसतील. स्टेडियमचे पाच प्रवेश द्वारे प्रेक्षकांसाठी खुली करण्यात येणार आहेत. सतरा-अठरा वर्षांवरील अतिउत्साही कार्यकर्त्यांना रोखण्याची जबाबदारी त्या त्या संघांची आहे. हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल झाल्यास त्यांना सोडविण्याची जबाबदारी तालीम संस्थांनी घेऊ नये. राजकीय हस्तक्षेपही नको."

Web Title: kolhapur news football match police