इचलकरंजीत विदेशी सिगारेटचा साठा; दोन व्यापाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

इचलकरंजी -  येथील दोन व्यापाऱ्यांच्या दुकानांवर छापा टाकून सुमारे १ लाख १३ हजार रुपये किमतीचा निरनिराळ्या ब्रॅंडचा विदेशी कंपनीचा सिगारेटचा साठा जप्त केला. या प्रकरणी दोघा व्यापाऱ्यांना उशिरा अटक केली आहे.

याची नोंद गावभाग पोलिसांत झाली आहे. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज सूर्यवंशी करीत आहेत. सुहास आनंदराव कनवाडे (रा. गांधी पुतळ्याशेजारी, इचलकरंजी), बलराम जियेंद्राय गनवाणी (कोल्हापूर रोड, इचलकरंजी) अशी अटक केलेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधी नरेश नारायण म्हेत्रे (रा. सिद्धार्थनगर, ॲनी बेझेंट रोड, वरळी, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.

येथील मेन रोडवरील सुहास कनवाडे यांची दिलीप एजन्सी, तर बलराम गनवाणी यांचे गांधी कॅम्पमध्ये गनवाणी स्टोअर्स आहे. या दुकानांत विदेशी सिगारेटच्या पाकिटाची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून छापा टाकला असता कनवाडेच्या दुकानामधून सुमारे ७१ हजार ५०० रुपयांचे व गनवाणीच्या दुकानातून ४१ हजार ५०० रुपयांचे बॉक्‍स जप्त केले.

Web Title: Kolhapur News Foreign Cigarette storage in Ichalkaranji