श्री महालक्ष्मी अन्नछत्रास परदेशातून निधीस परवानगी - राजू मेवेकरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - श्री महालक्ष्मी अन्नछत्रातर्फे श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या परगावच्या भाविकांना मोफत अन्नछत्र गेली दहा वर्षे अविरतपणे सुरू आहे. अन्नछत्राला आता परदेशातून निधी मिळविण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे. 

कोल्हापूर - श्री महालक्ष्मी अन्नछत्रातर्फे श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या परगावच्या भाविकांना मोफत अन्नछत्र गेली दहा वर्षे अविरतपणे सुरू आहे. अन्नछत्राला आता परदेशातून निधी मिळविण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अन्नछत्राचा विस्तार करण्यासाठी निश्‍चित उपयोग होईल, अशी माहिती अन्नछत्राचे संस्थापक अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी दिली.

शिस्तबद्ध नियोजन, स्वादिष्ट भोजन, विनम्र सेवा, स्वच्छता यामुळे अन्नछत्राला प्रतिसाद मिळतो आहे. महिन्याला लाखो भाविक अन्नछत्राचा लाभ घेतात आणि कोल्हापूरच्या दातृत्वालाही सलाम करतात. यापूर्वी संस्थानाला ८० जी अंतर्गत कर सवलत मिळाली आहे आणि आयएसओ ९००१-२००८ मानांकनही प्राप्त झाले आहे. परदेशातून निधी मिळविण्यासाठी अशा पद्धतीचे प्रमाणपत्र मिळणारी ही पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिलीच संस्था आहे. त्यासाठी संस्थेच्या कामाची, विविध सामाजिक उपक्रमांची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवली होती. सर्व निकषांमध्ये संस्था पात्र ठरल्यानेच हे मान्यतापत्र मिळाले आहे.

Web Title: Kolhapur news foreign funds allows to Shri Mahalaxmi Annachatra