कोल्हापूरातील चार नामवंत डॉक्‍टरांची प्राप्तीकरकडून चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

कोल्हापूर - शहरातील चार नामवंत डॉक्‍टरांची आज प्राप्तीकर विभागाने चौकशी केली. पहाटे एकाचवेळी या चारही डॉक्‍टरांच्या घरावर छापे घालण्यात आले, रात्री उशीरापर्यंत तपासणीचे काम सुरू होते. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर - शहरातील चार नामवंत डॉक्‍टरांची आज प्राप्तीकर विभागाने चौकशी केली. पहाटे एकाचवेळी या चारही डॉक्‍टरांच्या घरावर छापे घालण्यात आले, रात्री उशीरापर्यंत तपासणीचे काम सुरू होते. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

प्राप्तीकर विभागाच्या औरंगाबाद विभागाने ही कारवाई केली, त्याची माहिती रात्री उशीरापर्यंत कोल्हापूर विभागालाही नव्हती. 
चौकशी केलेल्यां डॉक्‍टरांत राजारामपुरी व कसबा बावडा रोडवरील प्रत्येकी एक मेंदू विकारतज्ज्ञ, ताराबाई पार्कातील अस्थीरोग तज्ज्ञ व शाहुपुरीतील प्रसुतीशास्त्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. पहाटे या डॉक्‍टरांसह त्यांचे कुटुंबियही झोपेतून उठण्यापुर्वीच प्राप्तीकर' चे पथक त्यांच्या दारात पोहचले.

घरात गेल्यानंतर या पथकाने डॉक्‍टरांसह घरातील सर्व नातेवाईकांचे मोबाईल ताब्यात घेतले, लॅंडलाईन फोनचे कनेक्‍शन तोडून टाकले. त्यांची वैद्यकीय तपासणीही दिवसभर बंद ठेवली. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली. यात मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचे समजते. 

या कारवाईसाठी औरंगाबाद विभागाकडील 25 अधिकाऱ्यांचे पथक पहाटे ताराराणी चौकातील एका हॉटेलच्या दारात दाखल झाले. त्याच ठिकाणी शंभरहून अधिक पोलिसांचा फौजफाटाही दाखल झाला. या हॉटेलच्या दारातून 25 पथके नियोजित ठिकाणी रवाना झाली. राजारामपुरी येथील मेंदू विकार तज्ज्ञाच्या रूग्णालयात व घरात एकाचेवळी हे पथक पोहचले. अशाच पध्दतीने इतर डॉक्‍टरांच्या घरीही या पथकाने धडक मारली. 

Web Title: Kolhapur News four doctors Income tax inquiry