दरवाजा उचकटून चोरट्यांचे शाहूवाडी पोलिस ठाण्यातून पलायन

शाम पाटील
शुक्रवार, 18 मे 2018

शाहूवाडी - शाहूवाडी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आज पहाटे ४ च्या सुमारास चार आरोपीनी पोलिस कोठडीतून पलायन केले. त्यामूळे एकच खळबळ उडाली  आहे. या प्रकरणाने शाहूवाडी पोलिसांच्या गलथान कार्यपध्दती समोर आली आहे.

रात्रीच्यावेळी बंदोवस्तावर असणाऱ्या पोलिसांना पहाटे चारच्या सुमारास डुलकी लागली. याचा फायदा घेऊन चोरट्यांनी दरवाजा उचकटला व पलायन केले. पळून गेलेल्या आरोपींची नावे अशी - सुरज सर्जेराव दबडे ( २०, वाठार ता . हातकणंगले), ओंकार महेश सुर्यवंशी ( १९  कासेगांव ता . वाळवा) , गोविंद वसंत माळी (कासेगाव ता . वाळवा) , विराज गणेश कारंडे ( १९ , पाउळी दरवेश ता . हातकणंगले ). 

सकाळी सहाच्या सुमारास ही घटना पोलिसांच्या निर्दशनास आली . त्यानंतर एकच धावपळ उडाली .कोल्हापूरसह शेजारील सांगली , रत्नागिरी जिल्ह्यात नाकाबंदी करून पोलिसांची सहा पथके पळालेल्या आरोपीचा शोध घेत आहेत. अशी माहिती पोलिस उपअधिक्षक आर आर .पाटील यांनी दिली .हे गुन्हेगार घरफोडी, चोरी आदी प्रकरणातील चाैकशीसाठी शाहुवाडी पोलीस ठाण्यात आणले होते. दरम्यान ते पळून गेले. 

या प्रकाराने तालुकयात एकच खळबळ उडाली असून शाहूवाडी पोलिसांच्या गलथान कारभाराची चर्चा रंगली आहे

Web Title: Kolhapur News four thief run away from police custody

टॅग्स