भुयेवाडीत लावली ४ हजार झाडे

भुयेवाडीत लावली ४ हजार झाडे

कोल्हापूर -  राजर्षी छत्रपती शाहूप्रेरित जंगल पुनर्निर्माण अभियानातर्फे आज दुसऱ्या टप्प्यात भुयेवाडी (ता. करवीर) येथे सुमारे चार हजार झाडे लावण्यात आली. या अभियानात समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत जवळपास १५ हजार झाडे लावण्याबरोबरच ती जगविण्याचाही संकल्प त्यांनी केला. ग्लोबल वार्मिंगच्या पार्श्‍वभूमीवर सकाळ माध्यम समूह आणि जंगल पुनर्निर्माण अभियानाच्या वतीने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकाराला येत आहे. प्रकल्पांतर्गत या परिसरात सव्वा लाख झाडे लावून जंगलाची निर्मिती केली जाणार आहे. 

पूजा बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे पारस ओसवाल, उद्योजक चंद्रकांत जाधव, निवासराव साळोखे, ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, नाना पाटील, मधुकर बामणे, प्रभाकर भोसले, सुनील लाड, दिलीप माने, दिग्विजय माने यांनी वृक्षारोपण केले. पन्हाळा संजीवन नॉलेज सिटी हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन पी. आर. भोसले, सेक्रटरी एन. आर. भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

भुयेवाडीच्या सरपंच अरुणा पाटील, संजय पाटील, सागर पाटील, संदीप जाधव, विजय यादव, नितीन गावडे, शहाजी मोरे, रमेश काटकर, भुयेवाडी येथील जिनिअस पब्लिक स्कूलचे प्राचार्य एस. एम. पाटील, माणिक पाटील, सनाजी पाटील, प्रकाश चौगुले, अजित मगदूम, अरविंद पाटील, रामराव मोरे, एकनाथ खोत, जी. एस. पाटील, प्रकाश पाटील, कृष्णात मोळे, बी. एम. पठाण, फिरोज शेख, रविराज पोवार, अनिल झुटके, प्रसाद शिंदे, संभाजीराव लाड (पट्टणकोडोली), वनविभागाचे डी. डी. बोडके, वनसंरक्षक सुरेश चरापले, एम. एस. पोवार, राजू उलपे, राहुल कांबळे, कृष्णात दळवी, कुंडलिक खाडे, विष्णू चव्हाण, यूथ क्रिएटिंग चेंज फौंडेशन, दिग्विजय दिलीप माने फ्रेंड सर्कल, टेंबलाईवाडी येथील प्रगती हौसिंग सोसायटीचे चेअरमन फिरोज शेख, रविराज पोवार, ब्रह्माकुमारीच्या सारिका बहेनजी, डॉ. रश्‍मी बहेनजी, निवासभाई, कृष्णाभाई, बजरंगभाई आदी उपस्थित होते.

तुम्हीही व्हा सहभागी
जंगल वाढविण्याच्या या मोहिमेत नागरिकांचाही सहभाग अपेक्षित आहे. जास्तीत जास्त, संघटना, विद्यार्थी, तालीम मंडळे, विविध संस्था उपक्रमात सहभागी होऊ शकतात. लावलेल्या झाडांना आठवड्यातून एकदा येऊन पाणी घालणे, आधारासाठी काठ्या लावणे अशी कामे ते स्वयंस्फूर्तीने करू शकतात. इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन निवासराव साळोखे यांनी केले.

‘सकाळ’चे कौतुक
मोहिमेचे प्रमुख निवासराव साळोखे यांनी जंगल पुनर्निर्माण कार्यक्रमास बळ दिल्याबद्दल सकाळ माध्यम समूहाचे कौतुक केले. ग्लोबल वार्मिंगचा धोका वाढतो आहे. त्यामुळे आरोग्यदायी जीवन जगायचे असेल तर झाडे लावणे आणि जगविणे ही काळाची गरज आहे. भावी पिढीसाठी हे काम आपल्याला करावे लागणार आहे. आज ‘संजीवन’च्या विद्यार्थ्यांनी येथे या उपक्रमात भाग घेऊन नवसंजीवनी दिली असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com