कुंटणखाना चालवणार्‍या मालकीणीसह चार महिलांना अटक

राजेंद्र होळकर
बुधवार, 21 मार्च 2018

इचलकरंजी - कबनूरनजीकच्या वेशा व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेलवर आज पोलीस उपअधिक्षक विनायक नरळे व निर्भया पथकाच्या पल्लवी यादव यांच्या संयुक्त पथकाने आज दुपारी छापा टाकला. यामध्ये कुंटणखाना चालवणार्‍या मालकीणीसह चार महिलांना ताब्यात घेतले. तसेच महिलांना लॉजवर पुरवणार्‍या रिक्षाचालकालाही रिक्षासह पोलिसांनी पकडले. हे हॉटेल एका राजकीय पक्षाच्या भावाचे आहे.

आस्मा शकील मोमीन (वय ३०, रा. बोरगाव, ता. चिक्कोडी), उषा विरेश्‍वर माने (वय २५, रा. शंभरफुटी रोड, शामनगर सांगली), मुमताज हेमंत शिंदे (वय ४७, रा. ब्राम्हणपुरी, मिरज), मुस्कान मुबारक शेख (वय ४५, रा. सांगली नाका) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहेत. तर महिलांना लॉजवर रिक्षातून पुरवणार्‍याचे अनमोल गुलाब पठाण (वय ४५, रा. नदीवेस नाका, इचलकरंजी) नाव आहे. लॉज व्यवस्थापक जावेद सलीम मुल्ला (रा. रुई) याला अटक केली आहे. पोलिसांनी कुठरखाना चालवणार्‍या महिलेसह इतर महिलांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल हॅण्डसेट जप्त केले.

गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी आणि त्याच्या परिसरात वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. याची दखल घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश पोवार यांनी गेल्या आठवड्यात इचलकरंजीतील लॉज मालकांची बैठक बोलावून लॉजवरील अवैध धंदे बंद करावेत. जर अवैध धंदे आढळून आल्यास कडक कारवाई केली जाण्याबाबतचा इशारा दिला होता. तरीही या हॉटेलवर हा व्यवसाय सुरू होता. याची माहिती पोलीस उपअधिक्षक विनायक नरळे आणि निर्भया पथकाच्या प्रमुख पल्लवी यादव यांच्या पथकाला समजली. त्यांनी संयुक्तपणे या हॉटेलवर आज छापा टाकला. यावेळी हॉटेलमध्ये वेशाव्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर वेशा व्यवसाय करणार्‍या कुंटणखाना चालवणार्‍या महिलेसह चार महिला मिळून आल्या. या महिलांची लॉजच्या रजिस्टरमध्ये कोणत्याही प्रकारची नोंद केली नव्हती. पोलिसांनी लॉजचे रजिस्टर बरोबर अन्य कागदपत्रे जप्त करीत लॉज व्यवस्थापक जावेद सलीम मुल्ला (रा. रुई) याला अटक केली. 

Web Title: Kolhapur News four women arrested in illegal work