ओळखपत्र, दस्त, शिक्के बनावट करून फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

कोल्हापूर - पाचगावच्या गावकामगार तलाठ्याला हाताशी धरून बनावट मतदान ओळखपत्र घेऊन डायरी उताऱ्यांत फेरफार करून, बनावट खरेदी दस्त केल्याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात तलाठ्यासह १२ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. सुरेश बंडोपंत पाटील (पाचगाव) यांनी याबाबत 
फिर्याद दिली.

कोल्हापूर - पाचगावच्या गावकामगार तलाठ्याला हाताशी धरून बनावट मतदान ओळखपत्र घेऊन डायरी उताऱ्यांत फेरफार करून, बनावट खरेदी दस्त केल्याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात तलाठ्यासह १२ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. सुरेश बंडोपंत पाटील (पाचगाव) यांनी याबाबत 
फिर्याद दिली.

इलाई बाबालाल मणेर (सानेगुरुजी वसाहत), अर्जुन जयवंत मिठारी (पाडळी खुर्द, सध्या कळंबा परिसर), उत्तम बाबूराव शिंदे (पाचगाव), संजय शिवाजी पाटील (सानेगुरुजी वसाहत), मधुकर पांडुरंग देसाई (राजारामपुरी), अभिजित सुरेश देशपांडे (ताराबाई पार्क), समीर गुलाब शेख (उजळाईवाडी), संभाजी आनंदराव गुरव (दाभीळ, ता. आजरा, सध्या कळंबा), सुनील बारऱ्या खेडेकर (कागलवाडी, कसबा बावडा), मनोज राम रावळ (मंगळवार पेठ), जयंत जनार्दन कोपार्डे (फिरंगाई मंदिरजवळ, शिवाजी पेठ), तसेच पाचगावचे गावकामगार तलाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

मणेर आणि मिठारी यांनी अन्य संशयितांच्या मदतीने प्रेमला पंडितराव जाधव व चंद्रकांत पंडितराव जाधव (दोघे रा. काशीद कॉलनी, सम्राटनगर परिसर) या दोघांचे बनावट मतदान ओळखपत्र तयार केले. ते वापरून बनावट खरेदी दस्त, बनावट शिक्के तयार केले. तसेच पाचगाव गावकामगार तलाठ्याला हाताशी धरून महसूल रजिस्टरमध्ये फेरफार नोंद केली. 

त्याआधारे मणेर याने सात-बारापत्रकी व डायरी उताऱ्यावर नोंदी घेतल्या. तसेच उतारे घेऊन परत संशयित आरोपी मणेर आणि मिठारी यांनी इतरांच्या मदतीने मिळकतीचे अर्जुन मिठारी यांच्या नावे सहायक निबंधक वर्ग - २ यांचे कार्यालयात खरेदी दस्त केला. त्या करारदस्ताच्या आधारे परत गावकामगार तलाठी यांना हाताशी धरून महसुली नोंदीत फेरफार केले. मिळकतीमध्ये मिठारी याचे नाव सात-बारा पत्रकी व डायरी उतारा घेतला. 

संशयित उत्तम शिंदे याच्या मदतीने फिर्यादी पाटील यांना मिळकतीमधील प्लॉट विकसन करारपत्र, बांधकाम परवान्यासह देण्याचे आहे, असे विश्‍वासात घेऊन सांगितले. त्याप्रमाणे बनविलेली कागदपत्रे, सात-बारा व डायरी उतारे फिर्यादी पाटील यांना दाखवून सुमारे सात लाखांच्या  मिळकत करारपत्राद्वारे बांधकाम परवान्यासह देऊन विश्‍वासघात 
केला.

Web Title: Kolhapur News Fraud by bogus identity cards, stamps