क्षीरसागर यांना मंत्रीपद मिळावे यासाठी प्रयत्नशील - गजानन किर्तीकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - ‘‘जिल्ह्यातील दहा विधानसभा जागांपैकी सहा सेनेचे आहेत. त्यात वाढ करून जिल्ह्यात दहा होणे आवश्‍यक आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारामध्ये हा आकडा सोळापर्यंत पोचला पाहिजे.’’ पश्‍चिम महाराष्ट्रासाठी क्षीरसागर यांना मंत्रीपद मिळावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी स्पष्ट केले. 

कोल्हापूर - ‘‘जिल्ह्यातील दहा विधानसभा जागांपैकी सहा सेनेचे आहेत. त्यात वाढ करून जिल्ह्यात दहा होणे आवश्‍यक आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारामध्ये हा आकडा सोळापर्यंत पोचला पाहिजे.’’ पश्‍चिम महाराष्ट्रासाठी क्षीरसागर यांना मंत्रीपद मिळावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी स्पष्ट केले. 

शिवसेनेतर्फे भाऊबिजेनिमित्त सुमारे हजार युवतींना हेल्मेटचे वाटप झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर, महापौर हसीना फरास, संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर उपस्थित होते. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रम झाला.

श्री. क्षीरसागर म्हणाले, ‘‘चंद्रकांतदादा आणि मी २००९ ला आमदार होतो. ते आणि मी २०१४ पासून एकत्र काम करत आहे. जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुकीत वारेमाप पैसा उधळला जातो. तो येतो कोठून हाच खरा प्रश्‍न आहे. दादांकडे महसूल व सार्वजनिक बांधकाम खाते आहे. या खात्यांची चौकशी होणे गरजेचे आहे.’’ 

श्री. दूधवडकर यांनी कोल्हापूरच्या जनतेने क्षीरसागर यांना दोनवेळा आमदारकी दिली असून, क्षीरसागर मंत्री होण्यास कोणतीच हरकत नसल्याचे सांगितले.

माजी महापौर मारुतराव कातवरे, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, माजी उपमहापौर उदय पोवार, जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, युवासेनेचे उपाध्यक्ष पवन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार राजेश क्षीरसागर फाऊंडेशनकडून मुसळधार पावसाने घराचे नुकसान झालेल्या घाटगे व कांबळे कुटुंबीयांना प्रत्येक दहा हजार रुपयांची मदत दिली. जिजाऊ ब्रिगेड, पहिले महिला ढोल पथक, महिला लेझीम पथकाचा सत्कार झाला.

गणेशोत्सवात घेतलेल्या सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेतील अनुक्रमे विजेत्या श्‍वेता रेवणकर, अक्षता रेवणकर, पवन पोवार यांना बक्षीस दिले. स्थायी माजी सभापती सुनील मोदी यांच्यासह अनेक युवकांनी शिवसेनेत 
प्रवेश केला. देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, जितेंद्र गायकवाड, ऋतुराज क्षीरसागर उपस्थित होते. अंकुश निपाणीकर व प्रकाश सरनाईक यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Kolhapur News Gajanan Kirtikar comment