इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा, 34 जणांना अटक

राजेंद्र होळकर
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

इचलकरंजी -  येथील जवाहरनगरमध्ये सुरू असलेल्या एका राजकीय नेत्याच्या अवैध तीनपानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये 1 लाख 95 हजारांची रोकड आणि 17 मोटरसायकलीसह सुमारे 9 लाखाचा मूद्देमाल जप्त केला. तसेच जुगार खेळणाऱ्या 34 जणाना अटक केली.

इचलकरंजी -  येथील जवाहरनगरमध्ये सुरू असलेल्या एका राजकीय नेत्याच्या अवैध तीनपानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये 1 लाख 95 हजारांची रोकड आणि 17 मोटरसायकलीसह सुमारे 9 लाखाचा मूद्देमाल जप्त केला. तसेच जुगार खेळणाऱ्या 34 जणाना अटक केली. अटक केलेल्यामध्ये 21 जण हे जवाहरनगरमधील आहेत. ही कारवाई पोलीस उपाधिक्षक विनायक नरळे यांनी केली.

रोहन चौगले, सुरेश शेटके, प्रशांत ठोंबरे, राजगोंडा पसरगोंडे, प्रमोद सणगर, प्रकाश बदी, अजित सुतार, दगडू बेनके, अशोक सणगर, संदीप मेटकुडे, संजय बेनगे, शुभम मगदूम, अर्जुन कुणकेरी, सखाराम पिराळे, सतीश सावंत, प्रदीप दळवी, विद्याधर बगडीकट्टी, प्रकाश नलवडे, जालेंद्र सुतार, संदीप साळूंखे, सतीश फडतारे, युनूस पाथवट, राजू रेवडे, संतोष कोळेकर, सत्ताप्पा वड्ड, अमर भिंगार्डे, प्रकाश महीद, भिमराव कोरवी, राजेंद्र तळकर, नझरूद्दीन मुल्ला, दस्तगिर म्हालींगपूरे, सागर कांबले, अजय पाटील, संतोष कोरवी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

 

Web Title: Kolhapur News Gambling raid 34 arrested

टॅग्स