अत्याळमध्ये भरवस्तीत गवा 

अवधुत पाटील
मंगळवार, 27 मार्च 2018

गडहिंग्लज - अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथे भरवस्तीत गवा आल्यामुळे खळबळ उडाली. दुपारी साडेबाराच्या सुमारास गव्याने ग्रामस्थांना दर्शन दिले. लिंगनूर कसबा नूलच्या हद्दीकडे हा गवा गेला. शेतातसुद्धा कधी न आढळणारा गवा आज थेट गावात आल्यामुळे ग्रामस्थांत भितीचे वातावरण पसरले. 

गावालगत पूर्वेला जयवंत जाधव यांची विहिर आहे. आज दुपारी शालेय विद्यार्थी या विहिरीवर आंघोळी करीत होते. या परिसरात उसाचे क्षेत्र आहे. विहिरीवर आंघोळी करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना अचानक गव्याचे दर्शन घडले. गव्याला पाहताच साऱ्यांना गावाच्या दिशेने धूम ठोकली. या विहिरीपासून गवा थेट गावात आला. महाराष्ट्र हायस्कूलच्या खालील बाजूने गावाबाहेर गेला.

तेथून उसाच्या शेतातून तो लिंगनूर कसबा नूल गावच्या हद्दीकडील ओढ्याकडे गेला. ओढ्यालगत गवा सुमारे अर्धा तास थांबून होता. 
अत्याळसह आजूबाजूच्या परिसरात जंगल नाही. पण, हा गवा कळपातून चुकलेला असावा. पाण्याच्या शोधात गावालगत आला असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

Web Title: Kolhapur News Gava in Atyal Gadhinglaj