कोल्हापूरचे चंद्रशेखर घोडके, अजय कुंभार, किरण चव्हाण यांचे युपीएससीत यश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

कोल्हापूर - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापुरातील तिघे उत्तीर्ण झाले. येथील प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमधील चंद्रशेखर रामेश्‍वर घोडके, फुलेवाडी येथील अजय गणपती कुंभार व नागनवाडी (ता. चंदगड) येथील किरण गंगाराम चव्हाण उत्तीर्ण झाले.

प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमधील चंद्रशेखर घोडके (मूळ गाव अंबाजोगाई, जि. बीड) याने पुणे विद्यापीठातून बी. ई. बी. टेक.ची पदवी मिळवली. तो प्री-आयएएस ट्रेंनिग सेंटरमध्ये २०१५-१६ पासून परीक्षेची तयारी करत होता. त्याच्या यशानंतर मित्रांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. त्याला संचालक प्रा. डॉ. अंजली पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. 

आई-वडील व मित्रांचा पाठिंबा आणि तीन वर्षे केलेल्या कष्टाचे फळ मिळाल्याचा आनंद होत आहे. देशसेवेच्या मिळालेल्या संधीचे सोने करू.
- अजय कुंभार

फुलेवाडीतील अजय गणपती कुंभारने ६३१ व्या क्रमांकाने यश मिळविले. पन्हाळा तालुक्‍यातील किसरूळ हे मूळ गाव. आईवडील दोघेही प्राथमिक शिक्षक आहेत. दुसऱ्याच प्रयत्नात त्याने हे यश मिळविले. नागनवाडी (ता. चंदगड) येथील किरण गंगाराम चव्हाणही उत्तीर्ण झाला आहे. किरणचे आई-वडील देवरहिप्परगी (ता. सिंदगी, जि. विजापूर) येथील लमाणी समाजातील आहेत.

Web Title: Kolhapur News Ghodake, kumbhar, chavan success in UPSC