दिव्यांगांना केबिनची कब्जेपट्टी लवकर द्या - हसीना फरास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

कोल्हापूर - दिव्यांग बांधवांना लवकरात लवकर केबिनची कब्जेपट्टी द्या, अशा सूचना महापौर सौ. हसीना फरास यांनी आज केल्या.आयुक्त डॉ. अभिजित चौधरी व दिव्यांग बांधवांच्या प्रतिनिधींची आयुक्त कार्यालयात बैठक झाली. 

कोल्हापूर - दिव्यांग बांधवांना लवकरात लवकर केबिनची कब्जेपट्टी द्या, अशा सूचना महापौर सौ. हसीना फरास यांनी आज केल्या.आयुक्त डॉ. अभिजित चौधरी व दिव्यांग बांधवांच्या प्रतिनिधींची आयुक्त कार्यालयात बैठक झाली. 

महापौर सौ. हसीना फरास म्हणाल्या, ‘‘१५ दिवसांपूर्वी दिव्यांगांसाठी पर्यायी जागा देण्याबाबत संयुक्त फिरती केली होती. यामध्ये शहाजी कॉलेज, सायबर चौक याठिकाणी अद्याप केबिन शिफ्ट केलेल्या नाहीत, असे सांगितले. इस्टेट विभागात दिव्यांगांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. १७३ केबिन्सपैकी ७८ लोकांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांना केबिन ताब्यात देता आलेल्या नाहीत. तरी प्रशासनाने तातडीने सर्व ठिकाणी केबिन शिफ्ट करून त्याठिकाणी काँक्रिट करून केबिन ताब्यात देण्यात याव्यात,’’ असे सांगितले. 

आयुक्त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, ‘‘महापौरांसमवेत फिरती करताना प्रशासनाने काही जागा निश्‍चित केल्या आहेत. त्याबाबत प्रशासनाने सर्व दिव्यांगांना लेखी पत्राद्वारे महापालिकेने निश्‍चित केलेल्या ठिकाणांपैकी मान्य असलेल्या जागा निवडण्याबाबत कळविले होते. एखाद्या जागेवर निश्‍चित केबिन्सपैकी जास्त मागणी अर्ज आल्यास त्या ठिकाणी ड्रॉ द्वारे केबिनचे वितरण केले जाईल. महापालिकेने निश्‍चित केलेल्या ठिकाणीच केबिन दिले जाईल. एखादी जागा निश्‍चित करून दिल्यानंतर त्यात कोणताही बदल केला जाणार नाही,’’ असे सांगितले. तसेच खेळाडूंना मानधन देण्याबाबत आलेल्या अर्जांचा विचार करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. 

इस्टेट अधिकारी प्रमोद बराले यांनी साने गुरुजी वसाहत, जरगनगर नाला, शेंडा पार्क, सायबर चौक, शहाजी कॉलेज, एलिगंट मार्केट, बीएसएनएल क्वॉटर्स कनाननगर याठिकाणी जागा निश्‍चित केल्या असून त्याठिकाणी संबंधित ७८ दिव्यांगांचे पुनर्वसन करणार असल्याचे सांगितले. 

या ठिकाणांपैकी ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी पर्यायी जागा मागणीसाठी अर्ज केले आहेत, त्यांच्यासाठी पर्यायी जागेवरील क्रमवारी निश्‍चित करण्याकरिता गुरुवारी (ता. १५) सकाळी ११ वाजता इस्टेट विभाग, शिवाजी मार्केट येथे ड्रॉ काढण्यात येणार असल्याचे सांगितले. या वेळी संबंधित दिव्यांग बांधवांनी स्वतः अथवा प्रतिनिधीद्वारे उपस्थित राहावे, असे आवाहन केले.

Web Title: kolhapur news Give the lights to the cabin early on the street