संपामुळे कोल्हापूरातून दक्षिण भारतात जाणारी माल वाहतुक ठप्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

कोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स असोसिएशन यांच्या तर्फे देशव्यापी संपाला सुरवात झाली आहे. यात कोल्हापूरातून दक्षिण भारतात होणारी माल वाहतुक फक्त ठप्प झाली आहे. स्थानीक मालवाहतुक सुरू आहे. 

कोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स असोसिएशन यांच्या तर्फे देशव्यापी संपाला सुरवात झाली आहे. यात कोल्हापूरातून दक्षिण भारतात होणारी माल वाहतुक फक्त ठप्प झाली आहे. स्थानीक मालवाहतुक सुरू आहे. 

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, कन्याकुमारी, चेन्नई मधील माल वाहतुकदारांच्या बहुतांशी गाड्या या संपात सहभागी झाल्या आहेत. कोल्हापूरातून कर्नाटक, केरळ, चेन्नई, कन्याकुमारी, पॉंडेचेरी इकडे जाणारी माल वाहतुक थांबली आहे तसेच तिकडून इकडे येणारीही माल वाहतुक थांबली आहे त्याचा परीणाम म्हणून औद्योगिक व व्यापारी क्षेत्रात लागणाऱ्या मालाचा तुटवडा कांही दिवसात जाणवणार आहे.

असोसिएशनचे प्राबल्य कर्नाटकापासून कन्याकूमारीपर्यंत विविध राज्यात आहे.  तेथील वाहतुकदार राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्य मार्गावर वाहतुक रोखू शकतात तसेच तेथील वाहतुकदार व महाराष्ट्रातील वाहतुकदारांच्या मागण्या सारख्याच आहेत. त्यामुळे येथील वाहतुकदारांनी संपात सहभाग दर्शविला आहे. स्थानीक वाहतुकदार महाराष्ट्रातील जवळचे भाडे मात्र करीत आहेत.

संपामुळे केरळकडे जाणारा कांदा तर कर्नाटकातून येणारी फळांची वाहतुक अपेक्षीत प्रमाणात झालेली नाही.

- जगन्नाथ भोसले, ट्रक मालक 

 शाहू मार्केट यार्डातील केरळकडे जाणार कांदा तर कर्नाटकातून येणाऱ्या बटाट्याची वाहतुक थांबली आहे तर औद्योगिक वसाहतीतून केरळकडे जाणारी लोखंडे सुटे भागाची वाहतुक थांबली आहे अशी स्थिती व्यापारी क्षेत्रातील केरळकडून येणार नारळ अन्य साहित्याची वाहतुक थांबली आहे. 

वाहतूकदारांच्या प्रमुख मागण्या -  

  • डिझेल दरवाढ रद्द व्हावी
  • संपूर्ण देश टोल मुक्त व्हावा किंवा टोलचे परमिट द्यावे, 
  • थर्ड पार्टी इन्शुन्स रद्द करावा 
  • माल वाहतुकदाराचे सरसकट उत्पन्न गृहीत धरून लावली जाणारा आयकर पध्दत रद्द करावी 

जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएसन अध्यक्ष सुभाष जाधव म्हणाले की, "" इंधन दरवाढ कमी करावी यासह विविध मागण्यासाठी ऑल इंडीया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस 26 जुलैपासून चक्का जाम आंदोलन सुरू करणार आहे. सद्याचे वाहतुकीचे भाडे परवडत नाही, स्वतःहून कांही माल वाहतुकदारांनी वाहतुक थांबवली आहे. चालकांची कमतरता आहे. भाडे परवडत नाही. म्हणून टेंपो, 408 मालगाडी, ट्रक, बॉक्‍साईड वाहतुकदार, डंपर मालकही संपात सहभागी होणार आहेत.'' 

Web Title: Kolhapur News Goods transport on Strike