वजन १२५ किलो; किंमत ७५ हजार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

खलील मणेर यांच्‍या बकऱ्याची चर्चा - बकरी ईदनिमित्त बाजारपेठ सज्‍ज

कोल्हापूर - बकरी ईदसाठी मोठ्यात मोठ्या वजनाचा उमदा बकरा खरेदी करण्याची हौस अनेकांनी जोपासली आहे. यातून रविवार पेठ चांदणी चौकातील खलील मणेर (किल्लेवाले) यांनी ७५ हजारांचा व १२५ किलोचा वजनाचा बोकड यंदाच्या बकरी ईदसाठी आणला आहे. हा बोकड यंदाच्या ईदचे आकर्षण बनला आहे. 

खलील मणेर यांच्‍या बकऱ्याची चर्चा - बकरी ईदनिमित्त बाजारपेठ सज्‍ज

कोल्हापूर - बकरी ईदसाठी मोठ्यात मोठ्या वजनाचा उमदा बकरा खरेदी करण्याची हौस अनेकांनी जोपासली आहे. यातून रविवार पेठ चांदणी चौकातील खलील मणेर (किल्लेवाले) यांनी ७५ हजारांचा व १२५ किलोचा वजनाचा बोकड यंदाच्या बकरी ईदसाठी आणला आहे. हा बोकड यंदाच्या ईदचे आकर्षण बनला आहे. 

बकरी ईदला वर्षानुवर्षाची परंपरा आहे. या दिवशी बोकडाचा बळी देण्याची प्रथा आहे. त्यासाठी सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रूपर्यंत मुस्लिम बांधव बकऱ्याची कुर्बानी देतात. त्यासाठी प्रतीकात्मक स्वरूपात बोकडाची खरेदी केली जाते. कधी सगळे भाऊबंद मिळून वर्गणी काढून एकच मोठा बकरा आणतात तर काही स्वतः बकरा खरेदी करतात. त्यासाठी कमीत कमी तीन-चार महिने पूर्वतयारी केली जाते; तर काही जण एक-दोन वर्षापूर्वीच लहान बोकड खरेदी करून त्यांचे पालनपोषण करतात.शहरात जवळपास एक ते दीड हजारांवर बकऱ्यांची खरेदी-विक्रीची उलाढाल होत असते. गेल्या पाच-सहा वर्षांत त्याचे प्रमाण कमी झाले आहे. जवळपास सातशेवर बकऱ्यांची विक्री होते, असे रफीक बागवान यांनी सांगितले. उर्वरित ठिकाणी बकरीच्या मटणाला मागणी असते. ईद सण जवळ आला की, जनावरे बाजारातून चांगल्या बकऱ्यांना मागणी वाढते. ईदपूर्वी दोन महिने अगोदर बकरी खरेदी होते. त्यासाठी काही जण जनावरांच्या आठवडी बाजारातून बोकड खरेदी करतात. त्यासाठी संकेश्‍वर, बोरगाव, जमखंडी, बागलकोट भागात जाऊन बकरे खरेदी केली जाते. 

दृष्टिक्षेपात
यंदा बकऱ्यांचा भाव ३००० ते २०००० पर्यंत
शहरभरात फक्त ईदसाठी ७०० ते १००० बकऱ्यांची खरेदी   
कोपार्डे, वाशी (ता. करवीर), पट्टणकोडोली, गडहिंग्लज, संकेश्‍वर येथून बकरी खरेदी
गेल्या दोन महिन्यांत जवळपास पाऊण कोटीची उलाढाल   

गवताची मागणी वाढली 
गेल्या दोन महिन्यांपासून ज्यांनी बकरे खरेदी केले आहे, त्यांना विकत चारा घेतला जातो. गवत मंडईत चारा खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी होते. याच कालावधीत गवताची एक पेंढी तीस रुपयांना विकली जाते. या काळात मागणी वाढल्याने गवत पेंढीची गवत मंडईत रोज ३००० वर पेंढ्या व एक लाखाची उलाढाल आहे.

Web Title: kolhapur news goose weight 125 & rate 75000