नृसिंहवाडी दत्त मंदिरात उद्यापासून गोपाळकाला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

नृसिंहवाडी - श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात मंगळवारपासून (ता. 30) श्री दत्त गोपाळकाला उत्सवास सुरवात होणार असून हा उत्सव जागरणाचा उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. उत्सवकाळात दत्त मंदिर दर्शनासाठी अहोरात्र खुले असते. 

रविवारपर्यंत (ता. 4) चालणाऱ्या व जागरणाचा उत्सव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गोपाळकाला उत्सवासाठी महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा, गुजरात आदी राज्यातून अनेक भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. येथील दत्त देव संस्थान मार्फत गोपाळकाला उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून भाविकांसाठी दर्शनरांग, मुखदर्शन, कापडी मंडप, क्‍लोज सर्किट व्यवस्था, आकर्षक विद्युत रोषणाई आदी करण्यात आली आहे. उत्सव काळात दत्त मंदिरात दररोज सकाळी सात वाजता संहिता पारायण, रात्री सात वाजता पवमान पंचसूक्त पठण, रात्री आठ ते बारा यावेळेत पंचामृत अभिषेक, रात्री साडेबारा वाजता महापूजा व दोननंतर धूप, दीप, आरती व पालखी सोहळा असे कार्यक्रम होतील. रविवारी (ता. 4) पुणे येथील अश्विनी मोडक यांचा भक्तीगीत व शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होईल. 

Web Title: Kolhapur News Gopalakala in narsinhwadi datta temple