कोल्हापूर जिल्ह्यात ४० वर ग्रामपंचायती बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  गावागावांत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गुरुवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस अनेक घटनांनी गाजला. प्रबळ उमेदवाराने माघार घेऊन त्याचा आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी साम, दाम आणि दंड नीतीचा वापर झाला. रात्री उशिरापर्यंत माघारीची प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी या हालचाली सुरू होत्या. 

कोल्हापूर -  गावागावांत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गुरुवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस अनेक घटनांनी गाजला. प्रबळ उमेदवाराने माघार घेऊन त्याचा आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी साम, दाम आणि दंड नीतीचा वापर झाला. रात्री उशिरापर्यंत माघारीची प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी या हालचाली सुरू होत्या. 

जिल्ह्यात राधानागरी तालुक्‍यात सर्वाधिक १० ग्रामपंचायती व १० गावच्या सरपंच निवडी बिनविरोध झाल्या; तर गगनबावडा तालुक्‍यात २, गडहिंग्लज तालुक्‍यात १ सरपंच व चंदगड तालुक्‍यात २  असे एकूण १५ सरपंच बिनविरोध झाले. तर जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यात ४० वर ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

जिल्ह्यातील ४७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील महत्त्वाचा समजला जाणारा अर्ज माघारीचा टप्पा आज संपला. सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. ४७२ ग्रामपंचायतीतून सरपंचपदासाठी २८०९ उमेदवारांचे २८४४ तर सदस्य पदासाठी १५ हजार ७७५ उमेदवारांचे १६९९६ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. गावागावांत दोन राजकीय गट सक्रिय आहेत. गावांवर आपल्याच गटाची सत्ता रहावी यासाठी या गटाच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. 

या निवडणुकीसाठी तालुक्‍याच्या ठिकाणीच अर्ज भरण्यापासून ते माघारीपर्यंतची प्रक्रिया झाली. त्यामुळे आज अर्ज माघारीसाठी गावागावांतून आलेल्या उमेदवार, त्यांचे समर्थकांमुळे निवडणूक कार्यालयाला जत्रेचे स्वरूप प्राप्त आले. अर्ज माघार घेण्यासाठी दिवसभर गावात व त्यानंतर तालुक्‍याच्या ठिकाणीही हालचाली गतिमान झाल्या होत्या. दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने माघार घेऊन आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती. 

सरपंच निवडणुकीत तर माघारीसाठी भविष्यातील राजकीय सोय, पैसा आणि काय मागेल त्याचे आश्‍वासन देऊन काही गावांत या निवडी बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. तर काही ठिकाणी दबाव टाकून संबंधितांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न झाले. मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने व प्रत्येक तालुक्‍यात निवडणुका असलेल्या गावांची संख्या जास्त असल्याने रात्री उशिरापर्यंत अर्ज माघारीची ही प्रक्रिया व त्यासाठीची तोडपाणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

तालुकानिहाय बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती अशा...
 आजरा : ५   गडहिंग्लज : ०   चंदगड : २  भुदरगड : ८  कागल : १   राधानगरी : १०  पन्हाळा : ४  गगनबावडा : ४  शाहूवाडी : ४  शिरोळ : १  करवीर :-    हातकणंगले :-       एकूण : ४०

तालुकानिहाय बिनविरोध सरपंचपद
 गगनबावडा : २  गडहिंग्लज : १  चंदगड : २   राधानगरी : १०.  एकूण बिनविरोध सरपंच : १५  
 

Web Title: Kolhapur news Grampanchayat Election