कोल्हापूरात भाजपचे दहा सरपंच बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने ‘दिल्लीत कमळ, गल्लीत कमळ’ अशी भूमिका घेऊन जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी कंबर कसण्यास सुरुवात केली. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात बिनविरोध निवड झालेल्या सरपंचांमध्ये दहा सरपंच व ११० सदस्य भाजपचे आले आहेत. उर्वरित ठिकाणांपैकी ९० ते १०० गावांमध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार आहे.

ग्रामीण भागापर्यंत पक्ष पोचवायचा असेल तर त्यासाठी सहकारात वावर महत्त्वाचा असल्याचे ओळखून प्रथम सहकारी संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी दिली. यासाठी सहकारात प्रस्थापित असणारे; पण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांवर जाळे टाकण्यास सुरुवात केली. यात अनेक मोठे मासे अडकले. त्यांच्या माध्यमातून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सहकारात लक्ष घालण्यास सुरुवात केली. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सहभागी होऊन आपल्या माणसांना स्थान देण्यास सुरुवात केली. त्याच माध्यमातून आता भाजप ग्रामपंचायत निवडणुकीत जोमाने उतरत आहे. 

जिल्ह्यातील ४१७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. माघारीनंतर १५ गावांमधील सरपंचपदाच्या निवडी बिनविरोध झाल्या. त्यात दहा सरपंच भाजपचे आहेत. ११० सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्ह्यातील साधारणपणे दोनशे ते सव्वादोनशे ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक पक्षातर्फे लढविण्यात येणार आहे. त्यातील साधारणपणे शंभर ग्रामपंचायतींमध्ये भाजप स्वबळावर पक्षाच्या नावाखाली आघाडी करेल. राहिलेल्या शंभर गावांमध्ये स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून आघाडी करण्यात येणार आहे. तीन गावांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडणूक झाली. मात्र, सरपंचपदाची निवडणूक लागली. या निवडणुकीची जबाबदारीही आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावरच सोपविण्यात आली 
आहे.

Web Title: Kolhapur news Grampanchayat Election