कोल्हापूरात 439 ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदानास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - जिल्ह्यात 439 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान सुरु झाले आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली.  प्रशासकीय यंत्रणा या मतदानासाठी सज्ज झाली आहे. 

कोल्हापूर - जिल्ह्यात 439 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान सुरु झाले आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली.  प्रशासकीय यंत्रणा या मतदानासाठी सज्ज झाली आहे.

गेल्या महिन्याभरापासून गावागावांमध्ये प्रचाराचा धुरळा उडाला होता आणि गावपातळीवरचे नेते म्हणजेच ग्रामपंचायत सदस्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील 439  गावात मतदान होणार आहे. 

कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील त्याचबरोबर शिवसेनेचे 6 आमदार या सगळ्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. उद्या (मंगळवारी) संपूर्ण मतदानाचा निकाल जाहीर होणार असून मतमोजणीसाठीही प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. काही भागांमध्ये काल (रविवारी) पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे आजही या भागात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सध्या शेतीची कामही सुरू असल्याने शेतीची कामे सांभाळून आज गावातला जागरूक मतदार हे मतदान करणार आहे.

दृष्टिक्षेपात निवडणूक
- जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती -     १०२६
- निवडणूक असलेल्या ग्रामपंचायती-     ४७२
- बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती -     ३३
- प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्रामपंचायती-     ४३९
- बिनविरोध सरपंच -     ३८
- एकूण सदस्य -     ४४२२
 - बिनविरोध विजयी सदस्य -     ३१३
-  मतदान केंद्रे-     १९८९
 

Web Title: Kolhapur News Grampanchayat Election