बेलेवाडी हुबळगीच्या पोटनिवडणूकीत काँग्रेसचे देसाई विजयी

रणजित कालेकर
शुक्रवार, 2 मार्च 2018

आजरा - बेलेवाडी हुबळगी या ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणूकीत सर्वसाधारण गटातून काँग्रेसचे नारायण विश्‍वास देसाई निवडून आले. त्यांना 183 मते मिळाली. त्यांनी राष्ट्रवादीचे श्रीकांत शंकर नार्वेकर यांचा 81 मतांनी पराभव केला. नार्वेकर यांना 102 मते मिळाली.

भाजपचे विठ्ठल तुकाराम मुदाळकर यांना केवळ 51 मते मिळाली. तिन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यासाठी जोरदार प्रचार मोहीम राबविली होती. प्रभाग दोनमध्ये झालेल्या या निवडणूकीत मंगळवारी (ता. 27) चुरशीने 342 इतके मतदान झाले होते. बुधवारी (ता. 28) सकाळी दहा वाजता येथील तहसीलदार कार्यालयात मतमोजणी झाली. श्री. देसाई यांचा विजय घोषीत झाल्यावर त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण केली.

आजरा तालुक्‍यात 9 ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी पोटनिवडणूक लागली होती. बेलेवाडी हुबळगी, पारपोली व श्रृंगारवाडी या तीन गावात निवडणूकीसाठी अर्ज दाखल झाले होते. पारपोली व श्रृंगारवाडी मध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महीला या राखीव जागेसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने येथे निवडणूक बिनविरोध झाली.

पारपोली येथून प्रभाग एक मधून पार्वती निवृती पाटील तर श्रृंगारवाडीतून लक्ष्मी मसणू सुतार यांची बिनविरोध झाली. कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी जी. एस. गोरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहीले. निवडणूक विभागाचे सी. एम. पालकर यांनी सहकार्य केले.

Web Title: Kolhapur News Grampanchayat Election Result