जनसुराज्य - कॉंग्रेसची शाहूवाडीत बाजी 

शाम पाटील
सोमवार, 28 मे 2018

शाहूवाडी - येथील निवडणुका झालेल्या 11 ग्रामपंचायतीपैकी शेंबवणे, सावे, सावर्डे खुर्द, आकुर्ले, शाहूवाडी, गोळवडे आदी 6 ठिकाणच्या ग्रामपंचायतीवर जनसुराज्य कॉंग्रेस आघाडीने बाजी मारली. माण, मालेवाडी व ऐनवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेने तर सुपात्रे व वालूर ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले. 

शाहूवाडी - येथील निवडणुका झालेल्या 11 ग्रामपंचायतीपैकी शेंबवणे, सावे, सावर्डे खुर्द, आकुर्ले, शाहूवाडी, गोळवडे आदी 6 ठिकाणच्या ग्रामपंचायतीवर जनसुराज्य कॉंग्रेस आघाडीने बाजी मारली. माण, मालेवाडी व ऐनवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेने तर सुपात्रे व वालूर ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले. 

सावे ग्रामपंचायतीच्या दहा जागापैकी 8 जागा जिंकून जनसुराज्य कॉंग्रेस आघाडीने सत्तांतर घडवून आणले. शिवसेनेचे पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नामदेव पाटील यांचे वर्चस्व, या आघाडीने मोडून काढले. टी. डी. पाटील यांच्या पॅनेलला 2 जागा मिळाल्या. 

सावर्डेखुर्द येथील ग्रामपंचायतीत 8 पैकी 6 जागा मिळवून जनसुराज्य कॉंग्रेस आघाडीने वर्चस्व कायम ठेवले. आकुर्ले ग्रामपंचायतीमधे जनसुराज्य कॉंग्रेस आघाडीच्या युवा पॅनेलने 8 पैकी 5 जागा जिंकून शिवसेनेची सत्ता संपुष्ठात आणली. माण गावावर शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य सर्जेराव पाटील यांनी आपली सत्ता कायम ठेवली. सुपात्रे व वालूर येथे सर्वच्या सर्व जागा जिंकून राष्ट्रवादीचे मानसिंग गायकवाड यांनी एकहती सत्ता ठेवली. 

मालेवाडी येथे 8 पैकी 5 जागा जिंकून शिवसेना राष्ट्रवादी आघाडीने सत्ता कायम राखली. ऐनवाडी ग्रामपंचायतीच्या 7 सदस्यांचा सर्व निवडी बिनवरोध झाल्या पण सरपंचप पदासाठी निवडणूक झाली. त्यामध्ये शिवसेनेच्या नाना भोसले यांनी विजय मिळविला. शोंबवणे ग्रामपंचायतीत 10 पैकी 9 जागा जिंकून जनसुराज्याचे ज्ञानदेव वरेकर यांनी सत्ता कायम राखली. गोळवडे ग्रामपंचायतीत 6 जागा जिंकून जनसुराज्य कॉंग्रेस आघाडीने सत्तांतर घडकून आणले . 

शाहूवाडी या तालुका ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी पोटानिवडणूक झाली. त्यामध्ये जनसुराज्य कॉग्रेस आघाडीच्या वैशाली लाळे यांनी शंभर मतांची आघाडी घेवून विजय मिळवला. तीन महिन्यापूर्वा येथील निवडणूक झाली होती. त्यावेळी सौ. लाळे केवळ 15 मतांनी पराभूत झाल्या होत्या. तीनपेक्षा जास्त आपत्य कारणावरून सौ. साविता पाटील यांचे सरपंचपद रद्द झाले होते. 
विजयानंतर कार्यकत्यांनी एकच जलोष करत गुलालाची उधळण केली. विजयी उमेदवारांच्या मिरवणूका काढल्या. 

शाहूवाडीतील विजयी सरपंच असे कंसात गाव -

वैशाली लाळेत (शाहूवाडी), आनंदा पाटील (सावे ), अककाताई खाके (माण), अमोल वरेकर (शांबवणे), वंदना पाटील (वालूर), राणी कुंभार (आकुर्ले), नाना भोसले (ऐनवाडी), दिपाली हंडे (सुपात्रे), भास्कर कांबळे (मालेवाडी), सिताबाई पाटील (सावर्डे खुर्द), सुमित कांबळे (गोळवडे). 

Web Title: Kolhapur News Grampanchayat Election Result