शिरोळ तालुक्यात सात ग्रामपंचायतीत सत्तांतर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

शिरोळ - तालुक्‍यातील चौदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत औरवाड, हेरवाड, नवे दानवाड, टाकवडे, अकिवाट, कनवाड, शिवनाकवाडी या सात ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे. 

शिरोळ - तालुक्‍यातील चौदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत औरवाड, हेरवाड, नवे दानवाड, टाकवडे, अकिवाट, कनवाड, शिवनाकवाडी या सात ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे. 

शिरोळ तालुक्‍यातील औरवाड, हेरवाड, अकिवाट, कनवाड, टाकवडे या ठिकाणी सरपंचपद हे सर्व साधारण गटाकरीता खुले असल्याने निकालाकडे तालुक्‍याचे लक्ष होते. येथीाल पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरवात झाली. पहिल्या फेरीत औरवाड, कनवाड, खिद्रापुर व शिवनाकवाडी या गावच्या मतमोजणीास सुरवात झाली. 

औरवाड येथील आशरफ पटेल व अफसर पटेल यांच्यामधील लढतीत आशरफ पटेल हे 1847 मते मिळवून अफसर पटेल यांना पराभव केला. याठिकाणी आमदार उल्हास पाटील व कॉंग्रेसचे गणपतराव पाटील यांनी आशरफ पटेल यांच्या पाठीमागे ताकद लावली होती. येथे निवडून आलेले उमेदवार ः महंमदशफी पटेल-422, यास्मिन मुल्ला-429, मेहरुन पटेल-454, मुगराबी चौगुले-481, नितीन शेट्टी-419, जयवंत मंगसुळे-436, प्रभावती रावण-422, निलोफर पटेल-281, वहिदा पटेल-275, किरण कांबळे-431, वहिदा इलियास पटेल-396. 

कनवाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत इनामदार सरकारांची पंचवीस वर्षे सत्ता होती. या निवडणुकीत भाजप शिवसेना आघाडीने सत्ताधारी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या आघाडीच्या चॉंदबुखारी इनामदार यांचा पराभव केला. सरपंचपद भाजप शिवसेनेकडे असले तरी ग्रामपंचायतीमध्ये बहुमत विरोधी आघाडीकडे राहिले आहे. सदस्य असे ः निया बुखारी इनामदार-331, मनिषा पाटील-324, दयानंद कांबळे-306, शरद सुतार-221, हनीपा पट्टेकरी-172 
शबाना बारगीर-332, अत्तार पटेल-340, आस्मा पटेल-338, बाबासो कुपाडे-264, बुढन नसिमा-308, जैदा बेगम इनामदार-314, मुमताजबी इनामदार-275. 

शिवनाकवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे श्रीकांत खोत यांनी 1298 मते मिळवून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे विश्‍वनाथ खोत यांचा पराभव केला. श्रीकांत खोत हे भाजपचे असून याठिकाणी सत्तांतर झाले आहे. सदस्य असे ः नानासो पुजारी-359, अश्‍विनी खोत-362, भारती आरगे-352, विजय खोत 257, सुरेखा खोत 250, सचिन पुजारी 303, आशा खोत 392. 

हेरवाड ग्रामपंचायतीमध्ये भाजप शिवसेना आघाडीने सत्तांतर घडविले आहे. याठिकाणी सरपंचपदी सुरगोंडा बाळगोंडा पाटील 1982 मते मिळवून विजयी झाले आहेत. निवडुण आलेले अन्य ग्रामपंचायत सदस्य ः रावसाहेब शिरढोणे-460, विकास माळी-433, अर्चना अकिवाटे-513, कृष्णा पुजारी-378, देवगोंडा आलासे-533, सुनिता आलासे-549, सुकुमार पाटील-344, सुषमा माने-462, सिमा बरगाले-488, अनिता कांबळे-643, मुक्‍ताबाई पुजारी-463, शांताबाई तेरवाडे-413, अमोल कांबळे-363, संभाजी मस्के-383, मंगल देबाजे-376. 

खिद्रापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदावर हैदरखान मोकाशी हे 704 मते मिळवून विजयी झाले. निवडून आलेले सदस्य ः नियाखान मोकाशी, 320, गीता पाटील-349, जयश्री पाटील-315, विजया रायनाडे-340, ललिता काळे-364, निर्मला मांजरे-329, गजानन गस्ते-350, बाबासो चिक्‍कोडे-325, नफिसा मोकाशी-372. 

राजापूरवाडी येथे छत्रपती ग्रुप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाड्यांनी सत्ता हस्तगत केली आहे. सरपंचपदी विजय एकसंबे विजयी झाले आहेत. तसेच यापूर्वी छत्रपती ग्रुपच्या मिनाक्षी कोळी, जमिन दानवाडे, शैलजा गोते, कविता कदम बिनविरोध निवडूण आल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवाजी कोळी हे 195 मतांनी विजयी झाले. 

नवे दानवाड ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी वंदना हरीशचंद्र कांबळे निवडूण आल्या आहेत. त्यांना स्वाभिमानी शिवसेना आघाडीचा पाठिंबा होता. याठिकाणी सत्तांतर झाले असले तरी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंगेसकडे ग्रामपंचायतीमध्ये बहुमत आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्येकी चार जागा जिंकल्या आहेत. निवडूण आलेले सदस्य ः राजेंद्र कांबळे 204 पांडुरंग धनगर 289, कमल बेरड 324, मुमताज लाडखान 174, सातगोंडा पाटील 359, शोभाताई परीट 317 , फातीमा लाडखान 308, विष्णु कांबळे 209, कमल कांबळे 223, संगिता कांबळे 203. 

हरोली ग्रामपंचायतीमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीच्य विरोधात शिवसेनेचे पं. स. सदस्य संजय माने असा सामना झाला. यामध्ये दीपा कांबळे या 686 मते मिळवून विजयी झाल्या. आघाडीने सात जागा याठिकाणी जिंकून सत्ता राखली असली तरी, शिवसेनेने तीन जागा जिंकून ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश केला आहे. निवडूण आलेले सदस्य ः कांबळे विशांत नेहरु 359, कांबळे बाळासाहेब मारुती 203, कांबळे सिमा योहान 332, माने रामचंद्र मल्लू 315, माने मनोहर रामचंद्र 177, गुजरे देवकी देवदान 366, कदम शारुबाई श्रीकांत 349, चौगुले महावीर बाळासो 236, माने मनिषा गुंडा 321, माने सरीता अमोल 285, चौगुले नेमिनाथ भाऊसो 390, परीट जयश्री राजेंद्र 404. 

उमळवाड ग्रामपंचायतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीने सत्तांतर घडविले आहे. याठिकाणी रामचंद्र यशवंत कांबळे यांनी 1809 मते मिळवून महेश शिवाजी तिवडे यांचा पराभव केला. निवडूण आलेले सदस्य ः तिवडे प्रमोद मधुकर 268, माने माधुरी दानलिंग 195, कोळी संपदा राजाराम 181, पांढरे राजु आण्णा 280, कांबळे सारीका सतिश 277, मगदूम दानाप्पा जिन्नाप्पा 390, ठोंबरे अमृता तानाजी 360, भवरे सरीता लक्ष्मण 377, कोळी राहुल अशोक 437, कामान्ना सुनिल दानापा 408, पाटील पुष्पा भुजगोंडा 436, कांबळे शरद जयपाल 395, पाटील शशिकला संजय 436, तिवडे रेखा रविंद्र बिनविरोध. 

राजापूर ग्रामपंचायतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजप, व स्थानिक शेतकरी आघाडी यांच्या आघाडीने सत्ता हस्तगत केली आहे. या आघाडीस अकरापैकी सात जागा मिळाल्या आहेत. सरपंचपदी सविता रत्नगोंडा पाटील या 1276 मते मिळवून विजयी झाल्या आहेत. निवडूण आलेले सदस्य ः उग्रे संजय बंडाप्पा 326, मगदूम विनायक काकासो 326, पाटील संगिता आलगोंडा 277, जमादार आलमासबी झाकीर 259, मकानदार तकदिरशहा झाकीर 366, कुंभार गुराप्पा दऱ्याप्पा 369, दानवाडे आशिनाबी शहाजान 377, पाटील मलगोंडा कलगोंडा 403, पाटील रुपमती शिवगोंडा 369, जंगले चॉंदणी हसन 349. 

टाकवडे ग्रामपंचायतीमध्ये शाहू परीवर्तन आघाडीने सत्तांतर घडवले आहे. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील यांना हादरा बसला आहे. या ठिकाणी सरपंचपदाचे प्रकाश वलगोंडा पाटील हे 2632 मते मिळवून विजयी झाले आहेत. निवडूण आलेले सदस्य ः शिवानंद जंगम 468, सुनिता कोळी 460, महादेवी पाटील 434, रोहित पाटील 360, नुरजॅंहा मुल्ला 336, मारुती चौगुले 620, लता वडर 556, चमनबी शेख 605, महावीर निर्मळे 547, तानाजी झुटाळ 529, बेबीताई कदम 407, अल्लाउद्दीन मुल्ला 486, नागेश काळे 565, धनश्री निर्मळे 637, प्रफुल कांबळे 362, रेखा कांबळे 537, रेखा वडगे 745. 

कवठेसार ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व भाजप आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना आघाडीचा पराभव करुन सत्ता कायम राखली आहे. याठिकाणी सरपंचपदी दिपाली भोकरे या 1361 मते मिळवून विजयी झाल्या आहेत. निवडूण आलेले सदस्य ः संदीप कांबळे 415, जगोंडा पाटील 379, रेश्‍मा आवळे 349, सबीरा फकीर 329, संतोष गाढवे 354, शाहानाजबी लतीफ 344, सविता पाटील, 353, मंहमदरफिकि मुल्लानी 371, दिपाली माने 346, अनिता किणीकर 446. 

अकिवाट ग्रामपंचायतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना व आवाडे गट आघाडीने कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता संपुष्टात आणून सत्तांतर घडविले. याठिकाणी स्वाभिमानीचे विशाल चौगुले 3172 मते मिळवून मोठ्या मताधिक्‍याने सरपंचपदी निवडूण आले आहेत. निवडूण आलेले सदस्य ः विठ्ठल गायकवाड 494, उज्वला चव्हाण 561, रुपाली रेठे 573, हेमंत कांबळे 541, अविनाश रायनाडे 476, कुसुम दानोळे 538, अजितकुमार चौगुले 546, सुमन माने 412, कांचन तवार 502, रामचंद्र हेरवाडे 576, महावीर जुगळे 588, जयश्री पाटील 641, भुपाल रायनाडे 472, संगिता नाईक 546, सितादेवी पाणदारे 494, इंद्रजित कोष्टी 417, जयश्री पाटील 326. 

संभाजीपूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी चौरंगी लढत झाली. याठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनुराधा कोळी या 868 मते मिळवून विजयी झाल्या आहेत. शिवसेनेच्या योगीता पुकाळे व कॉंग्रेस व स्वाभिमानी आघाडीच्या प्रिती देसाई यांचा पराभव झाला. शिवसेनेने याठिकाणी दिलेली लढत लक्षणीय ठरली. निवडूण आलेले सदस्य ः विशाल पवार 223, समिर पवार 235, सुनिता चिखले 243, वर्षा तावरे 198, ऋतुजा सावंत देसाई 227, अनुराधा कोळी 251, रुपाली खाडे 222, शेखर दाईगडे 205, विजयालक्षमी लडगे 192, दिलीप पाटील 203, गौसमहंमद गवंडी 240, दिनकर कांबळे 132, अश्‍विनी पाटील 225, 
 
संभाजीपुरमध्ये कोळींचा दोन ठिकाणी विजय 
संभाजीपूरचे सरपंचपद हे सर्व साधारण महिलेकरिता राखीव होते. याठिकाणी राष्ट्रवादीच्या अनुराधा कोळी निवडूण आल्या आहेत. तसेच प्रभाग दोनमधून ना. मा. प्रवर्ग स्त्री राखीव या जागेवरुनही निवडूण आल्या आहेत. दोन्ही ठिकाणी कोळी या निवडूण आल्या. 

एक, दोन मतांनी विजयी 
नवे दानवाडमध्ये लाडखान यांचा एक मताने, तर टाकवडे येथे महादेवी पाटील यांचा दोन मताने विजय झाला. नवे दानवाड येथे मुमताज लाडखान यांनी सुनिता पट्टणकुडे यांचा एक मतांनी पराभव केला आहे. तसेच टाकवडे येथे महादेवी पाटील यांनी संजीवनी पाटील यांचा दोन मतांनी पराभव केला. दोन्ही ठिकाणी पराभव झालेल्या उमेदवारांना पराभवाचा चटका बचला. 

Web Title: Kolhapur News Grampanchayat Election Result