मासिक खर्चावर जीएसटीचा मोठा परिणाम नाही

लुमाकांत नलवडे
सोमवार, 3 जुलै 2017

जीएसटी (वस्तू व सेवा कर) यामुळे सर्वसामान्य कुटुंबीयांच्या मासिक खर्चात फार मोठा परिणाम होणार नाही. कुटुंबीयांना दैनंदिनी जीवनात येणाऱ्या घटकांवर काय कोणत्या वस्तू स्वस्त आणि महाग मिळणार? मासिक उत्पन्नावर काय परिणाम होईल याचा आढावा थोडक्‍यात...
 

महाग काय आणि किती महाग झाले ?

जीएसटी (वस्तू व सेवा कर) यामुळे सर्वसामान्य कुटुंबीयांच्या मासिक खर्चात फार मोठा परिणाम होणार नाही. कुटुंबीयांना दैनंदिनी जीवनात येणाऱ्या घटकांवर काय कोणत्या वस्तू स्वस्त आणि महाग मिळणार? मासिक उत्पन्नावर काय परिणाम होईल याचा आढावा थोडक्‍यात...
 

महाग काय आणि किती महाग झाले ?

बॅंक व्यवहार तीन टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. एक आरटीजीएस केल्यास पूर्वी ५० रुपये आकारले जात होते तेथे आता ५१.५० पैसे आकारले जातील. (हजार रुपयांचे व्यवहार ग्रहीत धरून)
पॅकिंग भाज्या १८ टक्‍क्‍यांनी वाढणार, म्हणजे शंभर रुपयांच्या भाजीला ११८ रुपये लागणार (२००रु.खरेदी ग्रहित धरून)
लोणी, तूप, चीज अशा वस्तूंचा जीएसटी दुप्पट झाला आहे. त्या सहा टक्‍क्‍यांनी महागणार आहेत. म्हणजेच शंभर रुपयांचे चीज घेतल्यास १०६ रुपये द्यावे लागणार आहेत. (६०० रुपये खरेदी ग्रहित धरून)
व्हिडिओ गेम्स घेणे दोन टक्‍क्‍यांनी महागणार ः म्हणजे १०२ रुपये द्यावे लागतील. (२०० रुपये खरेदी ग्रहित धरून)
उदबत्ती खरेदी पाच टक्‍यांनी महाग होणार ः पंचवीस रुपयांची उदबत्ती सव्वा रुपये वाढणार (शंभर रुपयांची खरेदी ग्रहित धरून)
ब्रॅण्डेड डाळी, पनीर पाच टक्‍क्‍यांनी महागणार ः किलो डाळ १०० रुपयांस असल्यास ती १०५ रुपयांना मिळेल. (हजार रुपयांची खरेदी ग्रहित धरून)
कस्टर्ड पावडर, दाढीचे ब्लेड, टुथपेस्ट, डिओरंट शेव्हींग क्रीम दोन टक्‍क्‍यांनी वाढली आहे. (हजार रुपये खरेदी ग्रहित धरून)
कोिल्ड्रंक्‍समध्ये तीन टक्‍क्‍यांनी वाढ. शंभर रुपयांच्या पॅकिंग कोिल्ड्रंक्‍स १०३ रुपयांना मिळेल. (शंभर रुपये खरेदी ग्रहित धरून)
गोठविलेल्या अन्नावर दुप्पट कर लागू आहे. प्रत्येक शंभर रुपयांमागे सहा रुपये महाग होणार आहे. (मासिक खर्च ५०० ग्रहित धरून)    
केबल महिन्याला शंभर रुपयांना चार रुपये वाढ (मासिक खर्च २०० रुपये ग्रहित धरून
दूरध्वनी शंभर रुपयांना तीन रुपये वाढणार (मासिक खर्च ३०० रुपये ग्रहित धरल्यास) 

काय आणि किती स्वस्त झाले ?
एलईडी दिवे १२६ चे ११२ रुपयांना मिळतील. (मासिक खर्चात समावेश नाही)
चहा-कॉफी १०६ चे १०५ रुपयांना मिळेल. (मासिक खर्च ५०० रु. ग्रहीत घरून)
स्टील भांडी दर ११८ वरून १०५ रुपयांपर्यंत उतरले आहे. (मासिक खर्च २०० रु.ग्रहित धरून)
सॉसेस ११२ चे १०५ रुपयांना झाले. (मासिक खर्च १०० रुपये धरून)
आईस्क्रीम, इन्स्टंट सरबत ः १२६ चे ११८ रुपयांना झाले. (मासिक खर्च १००रु. ग्रहित धरून)
रिफाईन साखर १२६ ची ११८ रुपयांना झाली. (मासिक खर्च ५०० रु.ग्रहित धरून)
साबण १२६ चा ११८ रुपयांना झाला. (मासिक खर्च २०० रु. ग्रहित धरून) 
केसांचे तेल १२६ चे ११८ रुपयांना झाले. (मासिक खर्च २०० रु.ग्रहित धरून)
काडी पेटी ११८.५० चे १०५ रुपयांना (मासिक खर्च ५० रुपये धरून)
झाडू ११८चा १०५ रुपये (मासिक खर्च ५० रुपये धरून)
मेनबत्या व टूथ पावडर १२६ च्या ११२ रुपये. (मासिक खर्च ५० रुपये धरून)
ड्रायफुडस्‌चा कर ६ टक्‍क्‍यांवरून ५ टक्‍क्‍यांवर केला आहे. १००च्या खरेदीत रुपया कमी होईल. (मासिक खर्च ५०० रुपये धरून)

काहीच परिणाम नाही
वीज बिल दरात बदल नाही.
पेट्रोल-डिझेल दरातमध्ये बदल नाही.
घरगुती गॅस सिलिंडर दरात बदल नाही. 
जाम, जेली असे दैनंदिनी वापरातील पॅकिंग खाद्यपदार्थ दरात बदल नाही.

Web Title: kolhapur news GST does not have any major impact on monthly expenditure