फायर ऑन हेअर !

संभाजी गंडमाळे
रविवार, 22 जुलै 2018

कोल्हापूर - ‘खटक्‍यावर बॉट-जाग्यावर पलटी...’, ‘हाण की बडीव...’, ‘बंबात जाळ...’ या आणि अशा ‘टॅगलाईन’ म्हणजे जिंदादिली कोल्हापूर, पण आता बंबातच नव्हे तर ‘केसात जाळ’ही कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळतो आहे. शहरातील काही सलूनमध्ये ‘फायर कटिंग’ची सुविधा उपलब्ध झाली आहे. तेथे हा जाळ प्रत्यक्ष पहायला मिळतो आहे.

कोल्हापूर - ‘खटक्‍यावर बॉट-जाग्यावर पलटी...’, ‘हाण की बडीव...’, ‘बंबात जाळ...’ या आणि अशा ‘टॅगलाईन’ म्हणजे जिंदादिली कोल्हापूर, पण आता बंबातच नव्हे तर ‘केसात जाळ’ही कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळतो आहे. शहरातील काही सलूनमध्ये ‘फायर कटिंग’ची सुविधा उपलब्ध झाली आहे. तेथे हा जाळ प्रत्यक्ष पहायला मिळतो आहे.

एक वर्षापासून देशभरातील विविध शहरांत हा ट्रेंड सुरू झाला आणि आता बघता बघता तो येथे येऊन पोचला आहे. त्याला तरुणाईचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एका स्प्रेच्या साहाय्याने केस पेटवले जातात. अर्थात एका विशिष्ट टप्प्यांपर्यंतच केस पेट घेतात. केसाने पेट घेतल्यानंतर कंगव्याच्या सहाय्याने केसांना आकार दिला जातो. ही सारी प्रोसेस रिस्की असली तरी त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याची सुविधा पुणे, मुंबईसारख्या शहरात उपलब्ध आहे. त्याशिवाय सरसकट कुणालाही ‘फायर कटिग’ करता येत नाही. केस कशा पध्दतीचे आहेत, हे पाहूनच संबंधित हेअर स्टायलिस्ट अशा कटींगचा निर्णय घेतात. केसांना आग लागल्यानंतर काही सेकंदातच केसांना आकार देण्याचे कौशल्यही येथे महत्वाचे ठरते. पाण्याशिवाय केवळ एक स्प्रे आणि कंगव्याच्या सहाय्याचे अशा पध्दतीचे हेअरकट केले जातात.

 

‘‘तंत्रशुध्द प्रशिक्षण घेतलेले हेअर स्टायलिस्ट अशा पध्दतीचे हेअरकट करू शकतात. पुण्यात सहा महिन्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर मी सलूनमध्ये अशा पध्दतीच्या हेअरकट करायला सुरवात केली. ही प्रोसेस पूर्णपणे सुरक्षित असून अद्याप कुणाचीही तक्रार आलेली नाही. किंबहुना ग्राहकाची कुठलीच तक्रार येणार नाही, याची खबरदारी आम्ही घेत असतो. प्रशिक्षणात त्यावरच अधिक भर दिलेला असतो.’’

- राहूल जगताप, हेअर स्टायलिस्ट 

ऑनलाईन ‘जाळ’
मोबाईलमध्ये डोकं घालून बसणाऱ्या पोरांसाठी ‘तुझा मोबाईल जाळ चुलीत’ हे वाक्‍य आता घराघरात परवलीचे झाले आहे. मात्र, हिच तरूणाई सोशल मीडियावर ‘बंबात जाळ मित्र मंडळ’, ‘जाळ आणि धूर एकदमच’, ‘नुसता जाळ आणि धूर’ अशा बॅनरखाली एकवटलेली दिसते. अशा नावांची फेसबुक पेजीस आणि व्हॉटस्‌ ॲप ग्रुपही आहेत.

Web Title: Kolhapur News Hair cutting by fire