हेअर स्टाईल... लूक अन्‌ पर्सनॅलिटीही

सुयोग घाटगे
शुक्रवार, 11 मे 2018

मेस्सी, रोनाल्डो ते विराट कोहली व धोनी यांची क्रेझ आहे. पुरुषांसाठी नवीन केस ट्रेंडचे विविध प्रकार पाहावयास मिळतात. मात्र काही जुने (रेट्रो) प्रकारही पुन्हा चलनात येताना दिसत आहेत. स्टाईल स्टेटमेंट बरोबरच ही तुमची पर्सनॅलिटी बिल्ड करायला खूप महत्वाची भूमिका बजावत आहेत. 

कोल्हापूर - निरनिराळ्या हेअर स्टाईल्स कोल्हापूरमध्ये रुजू लागली आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीची स्टाईल कॉपी करण्यासाठी तरुणाई पुढे येत आहे. तर कलाकारांची केशरचना न निवडता सध्या तरुणाई विविध खेळातील स्टार खेळाडूंची स्टाईल स्वीकारत आहेत. मेस्सी, रोनाल्डो ते विराट कोहली व धोनी यांची क्रेझ आहे. पुरुषांसाठी नवीन केस ट्रेंडचे विविध प्रकार पाहावयास मिळतात. मात्र काही जुने (रेट्रो) प्रकारही पुन्हा चलनात येताना दिसत आहेत. स्टाईल स्टेटमेंट बरोबरच ही तुमची पर्सनॅलिटी बिल्ड करायला खूप महत्वाची भूमिका बजावत आहेत. 

आधुनिक मशीनरी...
हेअर स्टाईल करताना प्री वॉश-आफ्टर वॉश अशा स्टेप आहेत. केश रचनेसाठी पारंपरिक अवजारांबरोबरच आधुनिक मशीनरी आणि सेटिंग मशीन वापरले जातात. शहरामध्ये सध्या शंभर हुन अधिक अशी सर्व्हिस देणारे सलून आहेत. हे वेळखाऊ तसेच खूप जोखमीचे देखील आहे. एकदा चूक झाली तर ती सुधारण्याची खूप कमी संधी संधी असते. 

प्रकार...
सध्या कोल्हापूरमध्ये पोनी टेल, ग्रास कट, टॅपर कट, अंडर कट, टेंम्पल फेड, टेक्‍सचर्ड पॉम्प, शॉर्ट फेड, टॉप पॉम्प, व्ही-कट नेक लाईन, अंडर कट डिझायनर, साईड पार्ट, स्पाइक कट हे सध्या चलनात असलेले हेअर कटचे प्रकार आहेत. 

दोन हजारापर्यंत दर...
साधारण शंभर रुपये ते दोन हजार रुपयापर्यंत हेअर स्टाईलचे दर आहेत. हे दर हेअर ट्रीटमेंटनुसार ठरत असतात. किती वेळ लागणार आहे. जेल, वॅक्‍स, सेटिंग टाइम, तसेच लेव्हल हे सर्व विचारात घ्यावे लागते. त्यामुळे हे दर बदलतात.

हेअर स्टाईल ही सौंदर्य खुलवण्यास मदत करते. गेल्या दोन वर्षांमध्ये कोल्हापूरमध्ये याची क्रेझ वाढली आहे. लोक यासाठी खर्च करताना फारसा विचार करत नाहीत. तरुणांबरोबरच शाळेतील मुलेही हेअर स्टाईल करण्यासाठी उत्सुक असतात. प्रोफेशनल्सदेखील हेअर स्टाईल करत आहेत, जी सिम्पल व ट्रेंडी अशी आहे. हेअर स्टाईल बरोबर हेअर सप्लिमेंट प्रोडक्‍टदेखील वापरले जातात.  
- रोहित माने, हेअर नेटवर्क सलून 

हेअर स्टाईल ही स्टाईलपेक्षा जास्त मला कॉन्फिडन्स देते. समाजात वावरताना तुम्ही कसे दिसता याला खूप महत्व आहे. केशरचना व्यवस्थित आणि नीटनेटकी असेल तर तुमचे इम्प्रेशनदेखील तितकेच जास्त पडते. तुम्ही चारचौघात उठून दिसलात तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. 
- वैभव पोवार, विद्यार्थी

Web Title: Kolhapur News Hair style special story